विम्बल्डन सेमीफायनल मॅचवेळी वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लारा एका सुंदर तरुणीसोबत रॉयल बॉक्समध्ये दिसला. यानंतर ती तरुणी कोण आहे, याची जगभर चर्चा सुरू झाली. अखेर, ती त्रिनिदादची प्रसिद्ध मॉडेल इसाबेल बिस्नाथ असल्याचं समोर आलं आहे.
विम्बल्डन सेमीफायनलमध्ये खेळाडूंच्या लढतीइतकंच रॉयल बॉक्समधील सेलिब्रिटींची उपस्थिती लक्षवेधी ठरली. वेस्ट इंडिजचा महान बॅटर ब्रायन लारा एका अज्ञात तरुणीसोबत दिसला आणि सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.
26
लाराच्या बाजूची ‘मिस्ट्री वूमन’ व्हायरल
लाराच्या बाजूला बसून मॅच एन्जॉय करणाऱ्या या सुंदरीचे फोटो व्हायरल झाले. ती लाराची बायको आहे की मुलगी, यावर चर्चा सुरू झाली. पण लाराचं लग्न झालेलं नाही आणि ती त्याची मुलगी सिडनी लाराही नव्हती. अखेर ती मॉडेल इसाबेल बिस्नाथ असल्याचं समोर आलं.
36
कोण आहे ही इसाबेल बिस्नाथ?
३३ वर्षीय इसाबेल बिस्नाथ ही वेस्ट इंडिजमधील 'त्रिनिदाद अँड टोबॅगो' देशातील एक प्रसिद्ध मॉडेल आणि माजी विश्वसुंदरी स्पर्धक आहे. ती अनेक मोठ्या फॅशन ब्रँड्स आणि मासिकांच्या मुखपृष्ठावर झळकली आहे.
ब्रायन लारा आणि इसाबेल बिस्नाथ फक्त विम्बल्डनमध्येच नाही, तर याआधीही अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसले आहेत. त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याची चर्चा आहे, पण दोघांनीही यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
56
सेलिब्रिटींचा अड्डा विम्बल्डन रॉयल बॉक्स
विम्बल्डनचा 'रॉयल बॉक्स' हा नेहमीच जगभरातील क्रीडा, चित्रपट, राजकारण आणि ब्रिटिश राजघराण्यातील मोठ्या व्यक्तींसाठी राखीव असतो. यंदा लारा आणि इसाबेलच्या जोडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
66
रॉयल बॉक्समध्ये सचिन तेंडुलकरही!
लारा आणि इसाबेल यांच्याशिवाय, त्याच रॉयल बॉक्समध्ये भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही उपस्थित होता. सचिननेही टेनिस मॅचचा आनंद लुटला. त्याचे फोटोही सोशल मीडियावर खूप शेअर झाले.