Viral Video : ठाणे येथील वेदिक पेट क्लिनिकमधील कर्मचाऱ्याचा संतापजनक प्रकार उघडकीस, कुत्र्याला ग्रुमिंगच्या नावाखाली मारहाण

Published : Feb 13, 2024, 02:48 PM ISTUpdated : Feb 13, 2024, 03:02 PM IST
Viral video of Thane Vetic Pet Clinic Staffer hitting a dog under name of grooming watch here

सार

ठाणे येथील वेदिक पेट क्लिनिकमधील संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या क्लिनिकमधील कर्मचाऱ्याने कुत्र्याला मारहाण केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Viral Video : ठाणे येथील आर सिटी मॉल जवळ असलेल्या वेदिक पेट क्लिनिकमधील (Vedic Pet Clinic) एक संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. या क्लिनिकमध्ये खरंतर पाळीव प्राण्यांची काळजी घेण्यासह त्यांचे ग्रुमिंग केले जाते. पण आता समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ग्रुमिंगच्या नावाखाली पाळीव कुत्र्याला मारहणा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरील अकाउंट Streetsofbombay यांनी ठाणे येथील वेदिक पेट क्लिनिकचा व्हिडीओ शेअर केला आहे. याशिवाय व्हिडीओखाली एक भली मोठी पोस्टही लिहिली आहे.

व्हिडीओमध्ये दिसून येतेय की, वेदिक पेट क्लिनिकची टी-शर्ट घातलेला एक कर्मचारी कुत्र्याला मारहाण करतोय. याशिवाय कर्मचाऱ्यासोबतचा आणखी एक व्यक्ती देखील कुत्र्याला मारहाण करताना दिसतोय. मारहाण केल्यानंतर बिचाऱ्या कुत्र्याला काही बोलता येत नसल्याने तो निमूटपणे दरवाज्यातून बाहेरच्या दिशेने जाताना दिसतोय. त्यावेळीही वेदिक पेट क्लिनिकचा कर्मचारी त्याला लाथ मारताना दिसतोय.

या प्रकारावर पशूप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. याशिवाय कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. या व्हिडीओखाली अभिनेता वरुण धवनने देखील कमेंट करत म्हटले की, “तुमच्याकडे असलेली माहिती कृपया मला द्या. मी संबंधित प्राधिकाऱ्यांशी बोलेन.”

नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया
नेटकऱ्यांनी व्हिडीओवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एका युजर्सने म्हटले की, “तुमच्या पाळीव प्राण्याला कधीच एकटे सलून किंवा वेदिक क्लिनिकमध्ये सोडू नका.” दुसऱ्याने म्हटले की, “या प्रकाराबद्दल तक्रार केली पाहिजे.” तिसऱ्याने म्हटले की, “हा व्हिडीओ पाहूच शकत नाही.” अशा प्रकारच्या वेगवेगळ्या संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून दिल्या जात आहेत.

आणखी वाचा : 

Air Pollution in Mumbai : मुंबईकरांना करता येणार वायू प्रदूषणाची तक्रार, डाउनलोड करावे लागणार हे App

Viral Video : रहिवाशी इमारतीत तरुणींचा उच्छाद, मध्यरात्री नागरिकांच्या दाराला कडी लावली आणि....

मुंबईकरांसाठी अटल सेतू बनला पिकनिक स्पॉट, सेल्फी काढण्यासाठी थांबल्यास पोलिसांकडून दाखल केला जाणार FIR

PREV

Recommended Stories

Thane Metro : ठाणेकरांनो, तुमची प्रतीक्षा संपली! मेट्रो-4 डिसेंबरमध्ये सुरू होणार
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!