शिवसेना गटाचे माजी नगरसेवक यांच्यावर गुरुवारी फेसबुक लाइव्ह सुरू असताना गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकारानंतर अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
Abhishek Ghosalkar Shot Dead : उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरुवारी (8 फेब्रुवारी) घडली. या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. याशिवाय अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणारा मॉरिस नोरोन्हा याने देखील आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्याआधी मॉरिस नोरोन्हा (Mauris Noronha) त्यांच्यासोबत फेसबुक लाइव्ह करत होता. या प्रकरणात पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. दरम्यान, अभिषेक घोसाळकर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर यांचे पुत्र होते. असे सांगितले जातेय की, एकमेकांमधील वादातून गोळीबार करण्यात आला.
दुसऱ्या बाजूला, अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. यानंतर रुग्णालयाबाहेर शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. पक्षातील नेत्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
नक्की काय घडले?
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणारा मॉरिस नोरोन्हा त्यांच्यासोबत फेसबुक लाइव्ह करत होता. याच दरम्यान, मॉरिस लाइव्हमधून उठला आणि अभिषेक घोसाळकर यांच्यावर त्याने गोळीबार केला. गोळीबारानंतर मॉरिसने देखील आत्महत्या केली. पोलिसांनी मॉरिसचा मृतदेह ताब्यात घेतला.
मॉरिस नोरोन्हा नक्की कोण?
मॉरिस नोरोन्हा दहिसर-बोरिवली येथे स्वयंसेवी संघटना चालवणारा एका व्यक्ती होता. याशिवाय मॉरिसने स्वत:ला नेता म्हणून घोषित केले होते.
सहा दिवसांआधी देखील आमदारांसह समर्थकांवर झाला होता गोळीबार
महाराष्ट्रातील उल्हासनगर येथे देखील गेल्या शुक्रवारी (2 फेब्रुवारी) रात्री उशिरा भाजप आमदार गणेश गायकवाड यांच्यावर कथित रुपात शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गोळीबार करण्यात आला होता. या दोघांमध्ये एका जमिनीवरुन वाद होता असल्याची माहिती देण्यात आली होती.
आणखी वाचा :
Viral Video : रहिवाशी इमारतीत तरुणींचा उच्छाद, मध्यरात्री नागरिकांच्या दाराला कडी लावली आणि....