IAS पूजा खेडकर प्रकरणाची पंतप्रधान कार्यालयाने मागवले अहवाल, पूजा यांची पदावरून केली जाणार हकालपट्टी?

Published : Jul 15, 2024, 11:52 AM ISTUpdated : Jul 15, 2024, 12:37 PM IST
IAS Trainee Pooja Khedkar

सार

पूजा खेडकर प्रकरणाला वेगवेगळी प्रकरणे समोर येत आहेत आणि हे प्रकरण सध्या देशभरात चर्चेत आहे. त्यांच्या बाणेर येथील घरी पोलिसांनी नोटीस लावल्यामुळे प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. 

पूजा खेडकर प्रकरणाला रोज वेगवेगळी प्रकरणे समोर येत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी केलेले कारनामे आता संपूर्ण देशात ट्रेंडिंगला सुरु असल्याचे दिसून येते. त्यांच्या बाणेर येथील घरी पोलिसांनी नोटीस लावली असून यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागल्याचे दिसून येत आहे. स्वतःच्या खासगी गाडीवर दिवा लावणे, सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे आणि इतरही त्यांचे उद्योग समोर येत आहेत. त्यांच्या या प्रकरणांची पंतप्रधान कार्यलयाने दखल घेतल्याचे आता परत एकदा दिसून आले आहे. 

पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवण्यात आला अहवाल - 
पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी याबाबतचा अहवाल मागवला आहे. पूजा खेडकर यांच्या प्रकरणाचा अहवाल पाठवा असा आदेश पंतप्रधान कार्यलयाकडून देण्यात आला आहे. त्यांनी केलेलूया उद्योगांचा अहवाल पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहचला आहे. त्यांनी या प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला असल्याचे सांगण्यात आले आहे. 

ओबीसी कोट्यातून घेतला होता प्रवेश - 
पूजा खेडकर यांनी काशीबाई नवले मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला होता. एमबीबीएससाठी त्यांनी यावेळी प्रवेश घेतला होता. त्यासाठी त्यांनी २००७ मध्ये ओबीसी कोट्यातून प्रवेश घेतला होता. वडील आयएएएस असतानाही त्यांनी यावेळी नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र जोडले होते. त्यांच्या वडिलांची यावेळी मिळणारी मिळकत कमी होती की जास्त असाही प्रश्न विचारण्यात येत आहे. 

त्यांनी युपीएससी परीक्षा देताना अपंग प्रमाणपत्र जोडले होते. हे प्रमाणपत्र जोडल्यामुळे त्यांची आयएएसपदावर निवड झाली होती. त्यांची निवड होण्यामागे खऱ्या अर्थाने ओबीसी असणे आणि अपंग असल्याचे प्रमाणपत्र असणे या दोन गोष्टी सर्वात महत्वपूर्ण ठरल्या आहेत. 
आणखी वाचा - 
'काही चुकले असल्यास माफ करा...', नीता अंबानींनी मागितली फोटोग्राफर्संची माफी
Anant and Radhika Merchant Wedding : अनंत अंबानीच्या फेट्याला लावलेल्या कलगीची किंमत 160 कोटी?

PREV

Recommended Stories

अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!
गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!