अनंत अंबानी यांनी २ कोटींचे घड्याळ कोणाला दिले गिफ्ट, यादीतील

Published : Jul 15, 2024, 10:12 AM ISTUpdated : Jul 15, 2024, 10:13 AM IST
Ambani Wedding Watch

सार

अनंत अंबानी यांच्या लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्यांच्या लग्नात देश विदेशातील नेत्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वजण आल्याचे दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने बॉलिवूडमधील सर्वजण आवर्जून उपस्थितीत राहिल्याचेही दिसून आले.

अनंत अंबानी यांच्या लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. त्यांच्या लग्नात देश विदेशातील नेत्यांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वजण आल्याचे दिसून आले. यामध्ये प्रामुख्याने बॉलिवूडमधील सर्वजण आवर्जून उपस्थितीत राहिल्याचेही दिसून आले. यावेळी अनंत यांनी त्यांच्या मित्रांना घड्याळ गिफ्ट दिले. हे घड्याळ खूप महागडे असून ते कोणाकोणाला देण्यात आले याबाबत सगळीकडे चर्चा सुरु झाल्या. 

अनंत अंबानी यांनी दिलेले घड्याळ कोणाला मिळाले? 
अनंत अंबानी यांनी दिलेले घड्याळ कोणाला देण्यात आले हे जाणून घेण्यास आपण इच्छुक असाल. त्यांच्याकडून लग्नात देण्यात आलेले घड्याळ हे २ कोटींचे असून ते फक्त जवळच्या लोकांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये खासकरून रणवीर सिंग, शाहरुख खान आणि इतर जवळच्या मित्रांचा यामध्ये समावेश होता. जे घड्याळ गिफ्टमध्ये देण्यात आलं, ते 41mm 18k पिंक गोल्ड केसने बनलेलं आहे. घड्याळाची लांबी 9.5 mm आहे. डायल पिंक गोल्ड आहे.

अंबानी कुटुंबाने केला शाही लग्न सोहळा - 
मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाने यावेळी शाही लग्न सोहळा केला असून या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. सोशल मीडियावर सगळीकडे अंबानी कुटुंबियांच्या लग्न सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ दिसून आले. या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने रिलायन्स कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट देण्यात आले. त्यांनी गिफ्ट घेतल्यानंतरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले. 
आणखी वाचा - 
'काही चुकले असल्यास माफ करा...', नीता अंबानींनी मागितली फोटोग्राफर्संची माफी
Anant and Radhika Merchant Wedding : अनंत अंबानीच्या फेट्याला लावलेल्या कलगीची किंमत 160 कोटी?

PREV

Recommended Stories

अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!
गोव्यातील नाईटक्लब 'बर्च बाय रोमियो लेन'ला भीषण आग, 4 पर्यटकांसह 23 ठार तर 50 जखमी!