Mumbai : RBIसह अन्य ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक, गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Published : Dec 27, 2023, 02:55 PM ISTUpdated : Dec 27, 2023, 03:00 PM IST
Palghar Crime

सार

RBI Threat Email :  मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासह अन्य ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा एक ईमेल आला होता. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे.

RBI Threat Email :  मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) बॉम्बने उडवू अशी धमकी देण्यात आली होती. आरबीआयच्या कार्यालयाला बॉम्बने उडवण्यासंदर्भात ईमेल (Email) आला होता. या ईमेलसह तो पाठवणाऱ्यांनी काही मागण्याही केल्या होत्या. आता या प्रकरणात मुंबईच्या गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) मोठी कारवाई केली आहे.

मुंबईच्या गुन्हे शाखेने गुजरात मधील वडोदरा (Vadodara) येथून एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीने आरबीायच्या कार्यालात धमकीचा ईमेल पाठवण्यात आल्याचे रिपोर्ट्सनुसार सांगण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी केली जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

धमकीचा ईमेल पाठवत केल्या होत्या या मागण्या
व्यक्तीने धमकीचा ईमेल पाठवत मुंबईतील 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे त्यामध्ये म्हटले होते. यासोबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याशिवाय ईमेलमध्ये आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीाय बँकेत बॉम्ब ठेवल्याची धमकी दिली होती.

काय लिहिले होते ईमेलमध्ये?
ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीने मुंबईत 11 ठिकाणी बॉम्ब स्फोट घडवून आणू असे म्हटले होते. ईमेलमध्ये हे देखील लिहिले होते की, हा बॉम्ब स्फोट मंगळवारी (26 डिसेंबर, 2023) दुपारी 1 वाजून 30 मिनिटांच्या आसपास होईल. यामुळे खळबळ उडत मुंबई पोलिसांठी ठिकठिकाणी तपास सुरू केला. पण हाती काहीच लागले नाही. यासंबंधित मुंबईतील एमआरए मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता.

आणखी वाचा: 

मुंबईत RBIसह 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी, या 2 मोठ्या व्यक्तींच्या राजीनाम्याची केली मागणी

फ्रान्समध्ये अडकलेले विमान मुंबईत दाखल, 276 प्रवासी परतले

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या खुर्चीवर मांजरीचा ताबा, मुंबई पोलिसांनी शेअर केला VIDEO

PREV

Recommended Stories

Thane Metro : ठाणेकरांनो, तुमची प्रतीक्षा संपली! मेट्रो-4 डिसेंबरमध्ये सुरू होणार
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!