
Konkan: गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकण परिसरात तो कमी पडत आहे. १९ जुलै २०२५ रोजी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या धारा कोसळणार असून दमट हवामानामुळे उकाड्याचा त्रास होऊ शकतो.
मुंबई शहरामध्ये ढग दाटून आले आहेत. काही भागांत रिमझिम पाऊस येत असून काल संध्याकाळी सायन, दादर, मुंबई आणि चेंबूर या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. वातावरण दमट आणि उष्ण राहणार असून आद्रता वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळं नागरिकांना काळजी घेण्याचं अवाहन करण्यात आलं आहे.
ठाणे आणि मुंबई परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. वाशी, ऐरोली, ठाणे स्टेशन परिसरात सखल भागांत पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र आज सकाळपासून वातावरण ढगाळ असून रिमझिम पावसाची शक्यता आहे. तापमानात वाढ झाली असून उकाडा अधिक जाणवत आहे. दिवसभर दाट ढगांची उपस्थिती आणि काहिओ वेळा हलक्या पायसच्या सरींचा अनुभव मिळू शकणार आहे.
पालघर जिल्ह्यात काल दुपारी जोरदार पाऊस पडला आहे. आज सकाळपासून हवामान स्थिर असून आकाश पूर्ण ढगांनी भरून गेलं आहे. मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. दमट हवामानामुळे दुपारनंतर उष्णता वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांनी छत्री आणि पाणी सोबत ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.
कोकणात पावसाचा जोर कायम असून काल रात्रभर रिमझिम सरी बरसत होत्या. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, किनारपट्टी भागांत समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला असून सुरक्षिततेसाठी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.