Mumbai Weather : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. याशिवाय काही ठिकाणी उष्माघाताची प्रकरणे समोर आली आहेत. अशातच मुंबईकरांमध्ये पोटासंबंधित समस्याही वाढल्याचे समोर आले आहे.
Mumbai Weather : मुंबईकर एका बाजूने उष्णतेच्या लाटेमुळे हैराण आहेत. तर दुसऱ्या बाजूला नागरिकांमध्ये पोटासंबंधित समस्या वाढू लागल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात जवळजवळ 31 जणांना गॅस्ट्रोच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात भरती करण्यात आले. शहरातील शासकीय रुग्णालयांव्यतिरिक्त खासगी रुग्णांलयांमध्येही पोटासंबंधित समस्या उद्भवल्याने नागरिक भरती झालेल्या रुग्णांचा आकडा वाढला आहे.
जेजे रुग्णालयात 300 रुग्णांची तपासणी
जेजे रुग्णालयाच्या (JJ Hospital) औषध विभागाचे यूनिट हेड मधुकर गायकवाड यांनी म्हटले की, एप्रिल महिन्यात 300 गॅस्ट्रो रुग्णांची (Gastric Problem) तपासणी करण्यात आली. या रुग्णांमध्ये मळमळ होणे, उलटी होणे आणि डिहाइड्रेशनची समस्या दिसून आली होती. दरम्यान, चार ते पाच दिवसामध्ये रुग्णाची प्रकृती सुधारली जाते.
पोटाच्या समस्येवर प्रमुख कारण जंक फूड
मुंबईत जंक किंवा फास्ट फूड्सचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. रस्त्यालगत नागरिकांना वडापाव, भेळ, पाणीपुरीसह अन्य वेगवेगळ्या पदार्थांचा स्वाद घ्यायला मिळतो. पण पदार्थ तयार करताना स्वच्छतेची कितपत काळजी घेतली जाते असाही प्रश्न वेळोवेळी उपस्थितीत होतो. तरीही नागरिक आवडीने रस्त्यावरील पदार्थ आवडीने खातात. अशातच उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ल्यानेही पोटाच्या समस्येत वाढ होऊ शकते.
चार महिन्यांमध्ये 71 टक्क्यांनी वाढले रुग्ण
गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये प्रत्येक महिन्याला वाढ होत आहे. जानेवारीच्या तुलनेत एप्रिल महिन्यात गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये 71 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात 536 रुग्ण समोर आले होते. तर एप्रिल महिन्यात 916 नागरिकांना गॅस्ट्रोच्या समस्येचा सामना करावा लागला.
गॅस्ट्रोची लक्षणे काय ?
काय करावे?
आणखी वाचा :
Weather Update : उष्णतेची लाट आणि रेकॉर्ड ब्रेक उन्हाळा...जाणून घ्या मुंबईतील तापमानाची स्थिती
मुंबईतील उष्माघाताचा मुलांना त्रास, जुलाब आणि उलट्यांच्या समस्यांमध्ये वाढ