Salman Khan Firing : बॉलिवूडमधील अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याच्या प्रकरणातील आरोपी अनुज थापन याने तुरुंगात आत्महत्या केली. यावरूनच उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याने प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे.
Salman Khan Firing : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याच्या प्रकरणातील आरोपी अनुज थापन याने बुधवारी (01 मे) आत्महत्या केली. मुंबई पोलिसांनी अनुजने तुरुंगाच्या बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगितलेय. अशातच आता उद्धव ठाकरे गटाचे नेते आनंद दुबे यांनी आरोपी अनुजच्या आत्महत्येवर प्रश्न उपस्थितीत केले आहेत.
आनंद दुबे यांची प्रतिक्रिया
आनंद दुबे (Anand Dubey) यांनी म्हटले की, दोघांपैकी एक आरोपी ज्याने सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याने त्याचा मुंबई गुन्हे शाखेच्या तुरुंगात मृत्यू झाला. आरोपीची आत्महत्या झाल्याचे सांगितले जातेय. पण या प्रकरणात एखाद्या राजकीय नेत्याचा अथवा मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांचा हात असू शकतो. मुंबई पोलिसांचे तुरुंग सुरक्षित आहेत तर आरोपीची आत्महत्या कशी होऊ शकते? असा सवालही दुबे यांनी उपस्थितीत केला आहे. याशिवाय तुरुंगात सीसीटीव्ही कॅमेरे, अनेक अधिकारी आहेत. हे फार मोठे षडयंत्र आहे. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे आणि प्रकरणावर लवकरच तपास सुरू करावा अशीही विनंती दुबे यांनी केली आहे.
आत्महत्या नव्हे हत्या, आरोपीच्या भावाकडून प्रश्न उपस्थितीत
आज तकच्या रिपोर्ट्सनुसार, अनुजच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ अभिषेक थापन याने देखील काही आरोप लावले आहेत. अभिषेक थापन याने म्हटले की, अनुजची आत्महत्या नव्हे हत्या झाली आहे. आम्ही गरीब आहोत. माझा भाऊ ट्रक कंडक्टरच्या रुपात काम करायचा. त्याने तुरुंगात आत्महत्या केलेली नाही, त्याची हत्या झालीय. त्याला न्याय मिळावा असे मला वाटतेय. या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून आझाद मैदान पोलीस स्थानकात अपघातील मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आरोपीला पंजाब येथून अटक
सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणात आरोपी सागर पाल आणि विक्की गुप्ताला गुजरात येथून अटक करण्यात आले होते. चौकशीत समोर आले की, शस्रांचाही पुरवठा करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी पंजाब येथून सोनू कुमार बिश्नोई आणि अनुज थापन याला अटक केली. या चारही जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याची घटना 14 एप्रिल, 2024 रोजी घडली होती.
आणखी वाचा :
या सेलेब्रिटींनी केली आहे घरात आत्महत्या, जाणून घ्या कोण आहेत ते ?