महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला पोलिसांकडून अटक

Published : Feb 29, 2024, 04:36 PM IST
Devendra Fadnavis

सार

मुंबई पोलिसांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याच्या धमकीसह अपमानजनक भाषा वापरणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. याआधी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Mumbai Police :  मुंबई पोलिसांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासाठी अपमानजनक भाषा आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपाखाली अज्ञात व्यक्तीच्या विरोधात आयपीसी कलम 153 (ए), 500, 505 (3), 506 (2) आणि 34 अंतर्गत एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणात आता पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून आरोपीला अटक
मुंबई पोलिसांनी अधिक माहिती देत म्हटले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अपमानजनक भाषेचा वापर आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपाखाली सांताक्रुझ पोलिसांनी आरोपी योगेश सावंत याला अटक केली आहे. योगेशला कोर्टासमोर हजर करण्यात आले. आता योगेशला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

एका आठवड्याआधी मुख्यमंत्र्यांसह मुलाला जीवे मारण्याची धमकी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 9 कडून एका 19 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आले होते.

आणखी वाचा : 

महिलेला बेशुद्धीचे इंजेक्शन देत बलात्कार करण्यासह दाताच्या डॉक्टरने काढले अश्लील व्हिडीओ, पोलिसांकडून अटक

BMC Hospital : रडणे थांबवण्यासाठी नवजात बाळाच्या तोंडाला नर्सने चिकटपट्टी लावल्याचे प्रकरण, पोलिसांकडून गुन्हा दाखल

झिशान सिद्दीकीवर काँग्रेसची मोठी कारवाई, अखिलेश यादव यांना पक्षाने दिले यूथ काँग्रेसचे अध्यक्षपद

PREV

Recommended Stories

Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ
माझो वरली महागडी गं, रिअल इस्टेटमध्ये न्यूयॉर्कच्या लोअर मॅनहॅटनशी होतेय तुलना, अपार्टमेंटची किंमत 1 लाख रुपये प्रति चौरस फूट