Mumbai Rains Heroes : जेव्हा आपण घरी सुरक्षित होतो, ते भरपावसात ड्युटी बजावत होते

Published : Aug 20, 2025, 12:33 AM ISTUpdated : Aug 20, 2025, 12:38 AM IST

मुंबई - मंगळवारी मुंबईत दिवसभर मुसळधार पाऊस येत होता. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन करण्यात आले होते. यावेळी मुंबईतील काही रियल लाईफ हिरो भरपावसात आपली ड्युटी बजावत होते. जाणून घ्या...

PREV
18
मुंबईचे रियल लाईफ हिरोज

मंगळवारी मुंबईत अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. वाहतुकीच्या सेवा ठप्प पडल्या. अशा वेळी मुंबईतील रियल लाईफ हिरो जीव धोक्यात टाकून मुंबईकरांसाठी अहोरात्र काम करत होते. कुणी कायदा सुरव्यवस्था पार पाडत होते, तर कुणी वाहतूक नियमन करत होते, कुणी गटारांमधील कचरा काढत होते तर कुणी लोकल, बस चालवत होते.. या जाणून घ्या या रियल लाईफ हिरोंबद्दल…

28
मुंबई पोलिस

मुंबईत बाहेर मुसळधार पाऊस सुरु होता. सर्व शासकीय आणि खासगी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे ऑप्शन देण्यात आले होते. तेव्हा मुंबई पोलिस दलाचे जवान ड्युटी बजावण्यासाठी २४ तास रस्त्यांवर तैनात होते. अपघातात कुणाचा जीव जाऊ नये, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हे जवान आपल्या शिफ्टमधील तास न मोजता निरंतन लोकांची सेवा करण्यासाठी आपली ड्युटी पार पाडत होते. त्यांच्या या कामाला आमचा सलाम.

38
मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस

मंगळवारी आलेल्या कोसळधारांमुळे ठिकठिकाणी पाणी साचले. वाहतूकीचे सिग्नल बंद पडले. रस्त्यांवर अनेक किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या. अशा वेळी भरपावसात ड्युटी बजावण्यासाठी मुंबई वाहतूक विभागाचे पोलिस घरातून बाहेर पडले. कारण त्यांना वर्क फ्रॉम होमचा ऑप्शनच नव्हता. त्यांनी भरपावसात वाहतूक नियमन करत मुंबईकरांना लवकर घरी कसे जाता येईल याची काळजी घेतली. त्यांच्या या कर्तुत्वाला आमचा सलाम.

48
बीएमसीचे सफाई कर्मचारी

दिवसरात्र संततधार पाऊस आल्याने सर्वत्र पाणी साचले. अशा वेळी बीएमसीचे सफाई कर्मचारी रस्त्यांवर उतरले. त्यांनी कचऱ्यामुळे गटारे आणि पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या लाईन तुंबू नयेत याची काळजी घेतली. भरपावसात ते अहोरात्र हे काम करत होते. त्यामुळे शहरातील पूर लवकर आटोक्यात आला. नाहीतर शहरातील अनेक सखल भागातील घरांमध्ये पाणी साचले असते. एवढेच नव्हे तर लोकांना रस्त्यांवरुन गाड्या काढणेही शक्य झाले नसते. त्यांच्या या अविरत सेवेला आमचा सलाम.

58
मुंबई लोकलचे लोको पायलट

पावसामुळे लोकलच्या ट्रॅकवर पाणी साचले होते. त्यामुळे रुळ जवळपास दिसतच नव्हते. अशा वेळी त्यातून लोकल नेणे म्हणजे प्रवाशांच्या जिवाशी खेळण्यासारखे होते. पण तरीही सर्वसामान्य मुंबईकरांसाठी हे रियल लाईफ हिरो केवळ ड्युटीवर आले नाहीतर तर स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांनी लोकल सुरु ठेवल्या. त्यामुळे मुंबईची लाईफ लाईन अशी ओळख असलेल्या लोकल सुरु राहिल्या. चाकरमान्यांना आपल्या घरी जाता आले. त्यामुळे या लोको पायलटच्या कामाला आमचा सलाम.

68
बेस्टचे चालक-वाहक

मुसळधार पावसामुळे मध्य आणि हार्बर लोकल बंद पडली होती. पश्चिम लोकलही धिम्या गतीने आणि विलंबाने सुरु होती. अशा वेळी सर्वसामान्य मुंबईकरांना बेस्टच्या बसशिवाय पर्याय नव्हता. बेस्टचे चालक आणि वाहक यांनी भर पावसात बस सेवा देत लोकांना घरी जाणे सोईचे केले. प्रसंगी त्यांनी पुराच्या पाण्यातून बस काढली. धोका पत्करला. त्यांच्या या अतुलनिय कामगिरीला आमचा सलाम.

78
टॅक्सी ड्रायव्हर आणि ऑटो चालक

मध्य आणि हार्बर लाईन बंद होती. पश्चिम विलंबाने सुरु होती. अशा वेळी प्रवाशांना ने-आण करण्याचा सगळा भार बेस्ट सेवेवर आला होता. पण तेवढ्या बस उपलब्ध नव्हत्या. अशा वेळी प्रवाशांच्या मदतीला धावून आले ते टॅक्सी ड्रायव्हर आणि ऑटो चालक. त्यांनी आपली सेवा सुरु ठेवली. भर पुरातून वाहन काढले. त्यांच्या या कामाला आमचा सलाम.

88
रस्त्यांच्या शेजारील खाद्यपदार्थ विक्रेते

मुंबईची लाईफलाईन मध्य रेल्वे आणि हार्बर बंद पडली होती. वेस्टर्नही सुरळीत नव्हती. अशा वेळी लोकल स्टेशन्सच्या परिसरात मोठी गर्दी झाली. तसेच अनेक रस्त्यांवरही लोक वाहनाची वाट बघत ताटकाळत उभे होते. यावेळी त्यांची भूक भागविली ती या रस्त्यांवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी. त्यांनी भर पावसात आपली सेवा सुरु ठेवली. घरी जायला प्रचंड उशीर झाल्याने चामरमान्यांच्या पोटाची खळगी भरली. त्यांच्या सेनेलाही आमचा सलाम.

Read more Photos on

Recommended Stories