अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यात बॉम्ब...सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वरील पोस्टने खळबळ

सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वरील एका युजरने अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यात बॉम्ब फुटल्यास काय होईल अशा आशयाची पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळेच आता मुंबई पोलीस सतर्क झाले असून सध्या खळबळ उडाली आहे.

Chanda Mandavkar | Published : Jul 15, 2024 10:44 AM IST / Updated: Jul 15 2024, 04:18 PM IST

Bomb Hoax in Anant-Radhika Wedding : आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यावसायिक मुकेश अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यादरम्यान बॉम्बची धमकी दिल्याची बातमी समोर आली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. खरंतर, सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वरुन लग्नसोहळ्यातील बॉम्बची माहिती देणारी एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या बातमीने सध्या खळबळ उडाली आहे.

काय म्हटलेय पोस्टमध्ये?
सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वरील युजरने मुंबई पोलिसांना एक पोस्ट शेअर करत अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्यत बॉम्ब असल्याची माहिती दिली. ही पोस्ट FFSFIR नावाच्या युजरने शेअर केली होती. पोस्टमध्ये म्हटले होते माझ्या मनात एक विचित्र विचार आला आहे की, “जर अंबानीच्या लग्नात बॉम्ब फुटला तर, मध्यरात्रीच जगात उलाढाल होईल. कोट्यावधी रुपये स्वाहा होतील.”

या पोस्टनंतर मुंबई पोलिसांनी विवाहस्थळाच्या आसपासच्या परिसरातील सुरक्षिततेत अधिक वाढ केली. पोलीस अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी तैनात करत सुरक्षिततेचा आढावा घेतला गेला. दरम्यान, बॉम्बची धकमी अफवा असल्याचे वाटत होते. तरीही पोलिसांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाची पावले उचलली.

अंबानींच्या लग्नसोहळ्यात घुसखोरी करणाऱ्यांना अटक
शनिवारी (13 जुलै) अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात दोन जणांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यापैकी एक युट्यूबर असून दुसरा आंध्र प्रदेशातील एक व्यावसायिक होता. या दोघांनाही सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेत पोलिसांकडे दिले. दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एक नोटीसही धाडली गेली. याशिवाय दोघांची अधिक चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचा शोध
मुंबई पोलिसांकडून लग्नसोहळ्यात बॉम्ब असल्याची पोस्ट शेअर करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. यासंबंधित सोशल मीडियावरील प्लटॅफॉर्म X कडूनही अधिक माहिती मागवण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पण अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी प्राथमिक तपास सुरु करण्यात आला आहे.

12 जुलैला अनं-राधिकाचा विवाहसोहळा
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा 12 जुलैला लग्नसोहळा पार पडला. यानंतर 13 जुलैला अंबानी परिवाराने कपलसाठी शुभ आशीर्वाद सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ते दिग्गज कलाकार आणि राजकीय नेतेमंडळींनी उपस्थिती लावली होती. शुभ आशीर्वादनंतर 14 जुलैला रिसेप्शन ठेवण्यात आले होते. यावेळीही अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थिती लावली होती.

आणखी वाचा : 

'काही चुकले असल्यास माफ करा...', नीता अंबानींनी मागितली फोटोग्राफर्संची माफी

Anant and Radhika Merchant Wedding : अनंत अंबानीच्या फेट्याला लावलेल्या कलगीची किंमत 160 कोटी?

Read more Articles on
Share this article