होळीच्या दिवशी समुद्रात आंघोळ करण्यासाठी पाचजण गेले होते. त्यावेळी एकाचा बुडून मृत्यू झाला असून अन्य एकजण बेपत्ता झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
Mumbai : होळी खेळून झाल्यानंतर समुद्रात आंघोळ करण्यासाठी पाचजण समुद्रात गेले होते. यावेळी एकाचा बुडून मृत्यू झाला असून अन्य एकजण बेपत्ता आहे. बचाव कर्मचाऱ्यांना तीन जणांना समुद्रातून सुखरूप बाहेर काढल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
एका अधिकाऱ्यांनी म्हटले की, घटना सोमवार (25 मार्च) दुपारची आहे. होळी खेळून झाल्यानंतर माहिम (Mahim) आणि शिवाजी पार्कदरम्यानच्या (Shivaji Park) बीचवर पोहोण्यासाठी पाचजण गेले होते. त्यांच्यापैकी काही खोल पाण्यात गेल्याने बुडू लागले होते. हे पाहून मित्र त्यांच्या बचाव करण्यासाठी गेले.
चार जणांना जीव वाचवला
माहिम हिंदुजा रुग्णालयाजवळील चौपाटीवर तैनात असणाऱ्या बचाव कर्मचाऱ्यांनी चार जणांना समुद्रातून बाहेर काढले. तर अन्य एक मुलगा बेपत्ता आहे. समुद्रातून बाहेर काढण्यात आलेल्या पाचजणांपैकी हर्ष किंजळे नावाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अन्य जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय रात्री उशिरानंतर बचाव कार्य थांबवण्यात आले.
आणखी वाचा :
मलाड येथे 15 फूट खोल गटारात पडून परिवारातील दोन जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती नाजूक
मुंबईतील राणीबागेत वर्ष 2022-23 दरम्यान 40 पशूंचा मृत्यू, रिपोर्टमधून खुलासा