मलाड येथे 15 फूट खोल गटारात पडून परिवारातील दोन जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती नाजूक

मलाड येथील एका 15 फूट खोल गटारात पडून एकाच परिवारातील दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याशिवाय अन्य एकाची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे.

Mumbai : मालाड येथे गुरुवारी (21 मार्च) 15 फूट गटारात पडून एका अल्पवयून मुलासह दोघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अन्य एकाची प्रकृती नाजूक आहे. खरंतर, घटना गुरुवारी संध्याकाळी 5 वाजताची असून मलाड पश्चिम येथील अंबुजवाडीमध्ये अब्दुल हमीद रोडवर मालवानी गेट क्रमांक 8 येथे घडली आहे. एकाच परिवारातील तीनजण सार्वजनिक शौचालयाच्या गटारात पडले.

या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली असता त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गटारात पडलेल्या तिघांनाही अग्निशमन दलाने बाहेर काढले आणि कांदिवली येथील बी. आर. आंबेडकर रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी 18 वर्षीय सूरज केवट याला मृत घोषित केले. याशिवाय विकास केवट (20 वर्षीय) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वडील आणि दोन मुलं पडली गटारात
महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण विभागाने म्हटले की, मुलांचे वडील रामलगन केवट यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या रामलगन यांची प्रकृती नाजूक आहे. या दुर्घटनेचे ठोस कारण अद्याप कळलेले नाही.

नक्की काय घडले?
महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने दुर्घटनेबद्दल माहिती देत म्हटले की, तीनजण भूमिगत असलेल्या गटाराच्या चेंबरमध्ये पडले. खरंतर गटार एका सार्वजनिक शौचालयापासून 15 फूट खोल आहे. या शौचालयाचे हक्क एका कंत्राटाराकडे आहेत. दुर्घटनास्थळावरून तिघांनाही गटारातून बाहेर काढले. यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती नाजूक आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल
मलाड मालवणी पोलीस स्थानकातील वरिष्ठ निरीक्षक चिमाची आधव यांनी म्हटले की, "तिघहीजण कामगार होते आणि गटाराच्या स्वच्छतेसाठी त्यांना ठेवले होते. आम्ही प्राथमिक माहितीच्या आधारावर आपत्कालीन मृत्यूची नोंद करत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय घटनेचा अधिक तपासही केला जात आहे."

आणखी वाचा : 

मुंबईतील राणीबागेत वर्ष 2022-23 दरम्यान 40 पशूंचा मृत्यू, रिपोर्टमधून खुलासा

Mumbai Coastal Road : मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाबरोबरच प्रदूषणमुक्तीचे उद्दिष्ट साध्य करणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

BMC Hospital : रडणे थांबवण्यासाठी नवजात बाळाच्या तोंडाला नर्सने चिकटपट्टी लावल्याचे प्रकरण, पोलिसांकडून गुन्हा दाखल

Share this article