
मुंबई : मुंबईकरांनो, रविवारचा दिवस तुमच्यासाठी थोडासा अडचणीचा ठरणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून यामुळे लोकल सेवेवर परिणाम होणार आहे. रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात माहिती दिली असून, प्रवाशांनी प्रवासाची पूर्वतयारी करूनच बाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मध्य रेल्वे मेगाब्लॉक
ब्लॉक : सीएसएमटी ते विद्याविहार
मार्ग : अप आणि डाउन धीम्या लोकल
वेळ : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५
या वेळेत अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे काही लोकल रद्द होतील तर काही लोकल फेऱ्या सुमारे २० मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर रेल्वे मेगाब्लॉक
ब्लॉक : सीएसएमटी ते चुनाभट्टी / वांद्रे
मार्ग : अप आणि डाउन
वेळ : सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०
या कालावधीत सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल आणि सीएसएमटी ते वांद्रे / गोरेगाव दरम्यान धावणाऱ्या लोकल रद्द राहतील. मात्र, पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या लोकल कुर्ला स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वरून सोडण्यात येतील.
पश्चिम रेल्वे मेगाब्लॉक
ब्लॉक : बोरिवली ते गोरेगाव
मार्ग : अप आणि डाउन धीम्या लोकल
वेळ : सकाळी १० ते दुपारी ३
या वेळेत धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. बोरिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक १, २, ३ आणि ४ वरून कोणतीही लोकल धावणार नाही. काही लोकल सुमारे २० मिनिटे उशिराने धावतील.
मुंबई लोकल होणार एसी – मुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईतील सर्व लोकल मेट्रोप्रमाणे बंद दरवाज्यांसह वातानुकूलित करण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री लवकरच मुंबईत येऊन यासंदर्भात अधिकृत घोषणा करतील, असे त्यांनी सांगितले.