मुंबईत ठिकठिकाणी चर्चा, बैठका, आंदोलन सुरु झाली. याच वेळी २१ नोव्हेंबर १९५६ रोजी आंदोलकांनी सरकारचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला. संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी मुंबई दणाणून सोडली. एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून आणि दुसर्या बाजूने बोरीबंदर येथून मोर्चे निघाले. तेव्हा फ्लोरा फाऊंटन या नावाने ओळखल्या जाणार्या जागी दोन्ही मोर्चे एकत्र आले.