Published : Apr 29, 2025, 04:02 PM ISTUpdated : Apr 29, 2025, 04:05 PM IST
मुंबई ः मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर आणि उबाठाचे उपनेते दत्ता दळवी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
महायुती सत्तेत आल्यानंतर सरकारने मुंबई स्वच्छ करण्याचे काम केले. ब्रिटीशांनंतर महायुतीच्या सरकारमध्ये पहिल्यांदा मुंबईचे रस्ते धुतले गेले. मात्र त्याआधी काहीजणांनी मुंबईची तिजोरी साफ केली अशी टीका याप्रसंगी बोलताना दत्ता दळवी यांनी केली.
27
४५ ते ५० नगरसेवक आतापर्यंत शिंदे सेनेत
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ४५ ते ५० नगरसेवक आतापर्यंत शिंदे सेनेत गेले आहेत. मुंबई पालिकेतील विविध पक्षांच्या जवळपास ७० विद्यमान नगरसेवकांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा नक्कीच फडकेल असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
37
५०० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती
पक्षप्रवेशामध्ये धारावी, विक्रोळी, कांजूर, भांडूप. मुलुंडमधील महिला विभाग अध्यक्ष, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख ५०० हून अधिक कार्यकर्ते, मुरबाडमधील उबाठा तालुकाप्रमुख, उप तालुकाप्रमुख, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, विधानसभा क्षेत्र संघटक, युवासेना पदाधिकारी, जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जवळपास दोन हजार कार्यकर्ते, सोलापूर येथील मंगळवेढा तालुक्यातील १८ सरपंच, छत्रपती संभाजी नगरमधील ओबीसी महासंघाचे २२ जिल्हाध्यक्ष, हिंदुस्थान चित्रपट कामगार सेना महासंघाचे पदाधिकारी तसेच पिंटो यांच्यासह असंख्य ख्रिस्ती बांधवांनी शिंदे सेनेचा भगवा हाती घेतला.
यावेळी रोहयो मंत्री भरत गोगावले, खासदार संदिपान भुमरे, आमदार अशोक पाटील, ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, प्रवक्ते राजू वाघमारे आणि शिवसेनेचे मुख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
57
महिला कार्यकर्त्यांही होत्या उपस्थित
याशिवाय मुलुंड, भांडुप, विक्रोळी, ठाणे, रायगड,जळगाव येथील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला.