
मुंबई : वांद्रे पूर्व येथील भरत नगर जवळील तीन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. सदर घटनेतील 12 जणांना ढिगाऱ्याखालून काढत जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटना सकाळी 7.50 वाजता घडल्याचे सांगितले जात आहे.
प्राथमिक तपासानुसार, इमारतीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळेच इमारतीचा काही भाग कोसळला गेला. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाकडून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. याशिवाय मुंबई पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
स्थानिक रहिवासी यांनी म्हटले की, स्फोट झाल्याचे नक्की नाही. पण मशीदीजवळ घटना घडली असून त्याचेही नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. आतापर्यंत कोणतीही जीवतहानी झालेली नाही.