Gopichand Padalkar : शरद पवार म्हणजे कोरोना व्हायरस, पुण्यात एक कॉकटेल कुटुंब ते आव्हाडांसोबत राडा, ही आहेत पडळकारांची निवडक वादग्रस्त वक्तव्ये

Published : Jul 18, 2025, 09:30 AM ISTUpdated : Jul 18, 2025, 09:36 AM IST
padalkar

सार

या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमिवर जाणून घ्या, गोपिचंद पडळकर यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि इतर घटना.

मुंबई - आमदार गोपिचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानसभेच्या आवारात शर्ट फाटेपर्यंत हाणामारी झाली. त्यानंतर पोलिसांनी आव्हाड यांचे समर्थक नितीन देखमुख यांना रात्री अटक केली. त्यावरुन आव्हाडांनी रात्रभर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमिवर जाणून घ्या, गोपिचंद पडळकर यांची वादग्रस्त वक्तव्ये आणि इतर घटना.

1. विधानसभेतील राडा

महाराष्ट्र विधानसभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये विमानभवनाच्या पायऱ्यांवर थेट हाणामारी झाली. यावेळी मारामारी, धक्काबुक्की आणि शिविगाळ झाली. विधानसभा अध्यक्षांनी पोलिसांकडून अहवाल मागविला आहे. आव्हाड यांनी पडळकर यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर वैयक्तिक हल्ला करण्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर कडक कारवाईचा इशारा दिला आहे . एक व्हायरल व्हिडिओही समोर आला असून त्यात हाणामारीचे प्रसंग स्पष्ट दिसतात.

2. ख्रिश्चन धर्मगुरूंचा सैराट करण्याची धमकी

पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंवर ३ लाख ते ११ लाख रुपयांपर्यंत बाऊन्टी जाहीर केली, यामुळे मुंबई आणि जालना येथे मोठ्या प्रमाणात Christian समाजाने निषेध मोर्चा काढला. मुंबई आणि जालन्यात निघालेल्या मोर्च्यात पडळकरांची भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली.

3. राष्ट्रवादी नेत्यांवर टीका

सप्टेंबर 2023 मध्ये पडळकर यांनी अजित पवार, सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्यावर अत्यंत खोचक आणि आक्षेपार्ह टीका केली. त्यांनी सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून झाली. यावेळी अनेक ठिकाणी आंदोलन झाले. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी, विरोधस्वरूप ‘जोड़े मारो’ अभियान, तसेच चप्पलफेक ही घटना देखील घडली.

४. मारकडवाडी (डिसेंबर 2024): 

EVM विषयावरून शरद पवारांवर कडवट टीका केली, आणि “100 शकुनी मामा मेल्यावर एक शरद पवार जन्माला आले” या विधानामुळे वाद वाढला. राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

प्रमुख वादग्रस्त विधानं आणि सार्वजनिक प्रतिक्रिया

1. “भारतात पाकिस्तानापेक्षा जास्त गद्दार”

पडळकर यांनी मैंदर्गी (सोलापूर) येथे आयोजित एका हिंदू सभेत उल्लेख केला, “पाकिस्तानात जसे अतिरेकी आहेत, तशाच भारतात गद्दार आहेत,” आणि मुस्लिम समाजावर कडवट टीका केली. त्यांनी मुसलमानांवर “लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू व्हावा” असेही वक्तव्य केले. ही भाषणे वादळी ठरली.

2. धर्मांतरणविरोधी बक्षीस घोषणेचा आरोप

सांगली येथील मोर्चात पडळकरांनी धर्मांतराबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली. “ठोकून काढा तर 1–2 लाख, कायमचे घरात बसवले तर 3 लाख, सैराट करून दाखवले तर 11 लाख रुपये बक्षीस असेल.” या विधानामुळे जालन्यात ख्रिश्चन समाजाचा मोठ्या प्रमाणात निषेध मोर्चा झाला आणि कारवाईची मागणी करण्यात आली.

3. राष्ट्रवादी नेत्यांवर टीका

पडळकर यांनी अजित पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर “लबाड लांडग्याचं पिल्लू” आणि “लबाड राज्यात फिरू देणार नाही” असे अपमानकारक विधान केले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोडे मारो आंदोलनही आयोजित करण्यात आले. अखेरीस भाजपला माफी मागावी लागली.

4. पवार परिवारावर अन्य आरोप (मार्च 2025)

पडळकर यांनी रोहित पवार यांच्या समर्थकाला छातीवर टॅटू घेऊन पत्रकारांसमोर आणले. “पवार कुटुंब भ्रष्टाचार, जातीयवाद आणि गुंडगिरीचे प्रतिक आहे” असे आरोप केले. त्यांनी सुप्रिया सुळे व रोहित यांची गुप्त कारस्थाने उघड केली असेही सांगितले.

5 "शरद पवार म्हणजे महाराष्ट्राचा कोरोनाव्हायरस"

कोल्हापुरात एका सभेदरम्यान गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहाल टीका करताना म्हटलं: “शरद पवार हे महाराष्ट्रासाठी कोरोनासारखे आहेत. जसा कोरोना शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम करतो, तसाच शरद पवार यांनी राज्याच्या प्रत्येक संस्थेवर दुष्परिणाम केले.” या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक विभागाने पडळकर यांच्या विरोधात आंदोलन करत त्यांचं तोंड काळं करण्याची धमकी दिली. तर भाजप नेत्यांनी हे “वैयक्तिक मत” असल्याचं सांगत पक्षाने यावर तातडीने स्पष्टीकरण दिलं.

६ “औरंग्याची पिल्लावळ मंदिरांची नासधूस करतेय!”

हिंदुत्वावर भाष्य करताना पडळकर यांनी मुस्लीम समाजावर थेट आरोप केला. त्यांनी म्हटलं: “प्राचीन मंदिरांना इजा पोहोचवणारे ही औरंग्याची पिल्लावळ आहे. हिंदुत्वावर आज जे आक्रमण होतंय, ते याच मानसिकतेचं फलित आहे.” या विधानामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढली. अनेक मुस्लिम संघटनांनी याचा निषेध केला असून, पोलिसांकडे तक्रारीही दाखल झाल्या आहेत.

७ "कॉकटेल कुटुंब"

पुण्यातील एका कार्यक्रमात गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबीयांचे नाव न घेता अपरिहार्य टीका केली: “सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा आणि आई दुसरीच, पुण्यात असं एक कॉकटेल घर आहे. ते एकादशीच्या दिवशी दगडूशेठ गणपतीला मटण खाऊन जातात.” या वक्तव्यामुळे प्रचंड वाद निर्माण झाला.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Thane Metro : ठाणेकरांनो, तुमची प्रतीक्षा संपली! मेट्रो-4 डिसेंबरमध्ये सुरू होणार
मोठी बातमी! नवी मुंबईकरांसाठी 'जॅकपॉट'! तुमच्या प्रवासात होणार 'हा' सर्वात मोठा बदल; दोन नवीन रेल्वे स्थानकांची घोषणा!