पुण्यात Zika Virusचा गर्भवती महिलांना सर्वाधिक धोका, प्रशासन हाय अ‍ॅलर्ट मोडवर

Zika Virus Cases in Pune : पुण्यात सध्या झिका व्हायरसचे मोठ्या प्रमाणात नागरिकांना संक्रमण होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. या व्हायरसमुळे गर्भवती महिलांना अधिक धोका निर्माण झाला आहे. आतापर्यंत पुण्यात झिका व्हायरसचे एकूण 24 रुग्ण आढळून आले आहेत.

Chanda Mandavkar | Published : Jul 18, 2024 11:15 AM IST / Updated: Jul 18 2024, 04:47 PM IST

Zika Virus Cases in Pune : महाराष्ट्रात आणखी तीन झिका व्हायरसची प्रकरणे आढळून आली आहेत. यामध्ये एका 14 वर्षीय मुलीचा, 27 वर्षीय महिला आणि एका 49 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. यामुळे पुण्यातील झिका व्हायरसच्या आतापर्यंतची एकूण रुग्णांची संख्या 24 वर गेल्याची माहिती देण्यात आली आहे. यापैकी काही गर्भवती महिलांचा देखील समावेश आहे. अशातच प्रशासनाकडून शहरात फैलावत चाललेल्या झिका व्हायरस फैलावू नये म्हणून प्रयत्न केले जात असून नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना देखील जाहीर केल्या आहेत.

कसा होतो झिका व्हायरस?
झिका व्हायरस डास चावल्याने होतो. पण काहीप्रकरणात व्यक्तीला झिका व्हायरस लैंगिक संबंध अथवा रक्ताशीसंबंध आल्यानंतही होत असल्याचे दिसून आले आहे. झिका व्हायरस झाल्यानंतर व्यक्तीमध्ये त्याची पाच ते सात दिवसात मध्यम लक्षणे दिसून येतात. जसे की, डेंग्यू ताप अथवा ताप आल्यानंतर व्यक्तीला जो त्रास होतो तसेच झिका व्हायरसमध्येही होते.

झिका व्हायरसची सर्वसमान्य लक्षणे काय?

झिका व्हायरसपासून असे रहा दूर
झिका व्हायरस होण्यापासून दूर राहण्यालाठी तलाव, चिखल अथवा अस्वच्छता असलेल्या ठिकाणापासून लांबच राहा. याशिवाय फुल सिल्व्ह्ज कपडे परिधान करा. घरातील एअर कंडीशनर अशा ठिकाणी असावा जेथे मच्छरांचा अत्याधिक वावर नसेल. घर अथवा घराच्या आसपासच्या परिसरात पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळावे. यावेळी गर्भवती महिला आणि नवजात शिशूच्या आरोग्याची देखील अत्याधिक काळजी घ्यावी.

प्रशासनाकडून झिका व्हायरसविरोधात मोहिम
संपूर्ण महाराष्ट्रात झिका व्हायरसची आतापर्यंत एकूण 28 प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांचाही समावेश आहे. दरम्यान, पुण्यात अवघ्या 15 दिवसांत झिका व्हायरसची 20 प्रकरणे समोर आली. यापैकी 10 गर्भवती महिलांचा समावेश आहे. यामुळे प्रशासन हाय अ‍ॅलर्ट मोडवर असून झिका व्हायरसचा फैलाव वाढू नये म्हणून नागरिकांना सातत्याने सूचना देत आहेत. याशिवाय अधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हेल्थ चेकअपही केले जात आहे.

दरम्यान, अधिकाऱ्यांकडून 45 हजार घरांमध्ये पाहणी करत 400 पुरुषांच्या रक्ताच्या सॅम्पल्स घेण्यात आल्या आहेत. याशिवाय 350 गर्भवती महिलांच्या रक्ताचे सॅम्पलही घेतले आहे. या सर्वांच्या चाचणीचे रिपोर्ट्स येणे अद्याप शिल्लक आहे. नागरिकांना घरात पाणी साचू देऊ नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा : 

Chandipura Vesiculovirus कसा फैलावतो? जाणून घ्या लक्षणांसह अन्य महत्वाची माहिती

पेर खाण्याचे 8 भन्नाट फायदे, मधुमेहही राहिल नियंत्रणात

Share this article