‘लाडका भाऊ योजने’साठी कसा कराल अर्ज?, जाणून घ्या दरमहा किती रुपये मिळणार?

Ladka Bhau Yojna : राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे. या योजनेलाच 'लाडका भाऊ योजना' असं म्हंटलं जात आहे.

Rameshwar Gavhane | Published : Jul 18, 2024 10:11 AM IST / Updated: Jul 18 2024, 03:44 PM IST

Ladka Bhau Yojna : राज्य सरकारने अर्थसंकल्पात 'लाडकी बहीण' ही महत्त्वकांक्षी योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार महिलांना दर महिना दीड हजार तर वर्षाला 18 हजार रुपये मिळणार आहे. ही योजना जाहीर होताच लाडक्या भावाबद्दल काय? असा प्रश्न राज्य सरकारला विचारला जात होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या प्रकराची योजना जाहीर करावी अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमध्ये बोलताना राज्यातील तरुणांसाठी म्हणजेच लाडक्या भावांसाठी Ladka Bhau Yojna असलेल्या योजनेची माहिती दिली.

मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांच्या आक्षेपाला उत्तर देताना सांगितलं की, 'लाडक्या बहिणीसाठी योजना आणलीत, आता लाडक्या भावांचं काय? असं प्रश्न काही जणांनी विचारला होता. लाडक्या भावांकडेही आमचं लक्ष आहे, असं मला त्यांना सांगायचं आहे. आम्ही त्यांच्यासाठी देखील योजना आणलीय. 12 वी पास तरुणांना 6 दरमहा 6 हजार, डिप्लोमा झालेल्या तरुणाला 8 हजार तर पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिना मिळतील.

'इतिहासात पहिल्यांदाच सरकारने आणली योजना'

या योजनेतील तरुण वर्षभर एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप करेल, त्यानंतर तिथे त्याला कामाचा अनुभव मिळेल आणि त्या अनुभवाच्या जोरावर त्याला नोकरी देखील मिळेल. या योजनेनुसार राज्यातील तरुण ज्या कारखान्यात काम करतील अप्रेन्टिसशिप करतील तिथे त्यांच्यासाठी आपले सरकार पैसे भरणार आहे. त्याचबरोबर त्यांना स्टायपंड देईल. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सरकारने अशा प्रकारची योजना आणली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Ladka Bhau Yojna : 'लाडका भाऊ योजने'चा कोणाला फायदा?

12 वी उत्तीर्ण - दरमहा 6 हजार रुपये

डिप्लोमा झालेला तरुण - दरमहा 10 हजार रुपये

पदवीधर तरुण - दरमहा 10 हजार रुपये

Ladka Bhau Yojna : 'लाडका भाऊ योजने'ची पात्रता

या योजनेसाठी फक्त महाराष्ट्रातील तरुण पात्र आहेत.

या तरुणांचे वय 18 ते 35 वर्षांच्या दरम्यान असावे

शैक्षणिक पात्रतेचे 12 वी पास, डिप्लोमा, पदवीधर असे 3 गट आहेत

शिक्षण सुरु असणाऱ्या तरुणांना योजनेचा लाभ घेता येणार नाही

बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा फायदा मिळेल

अर्जदारचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न असावे

Ladka Bhau Yojna : या वेबसाईटवर करा नोंदणी

इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करावी

आणखी वाचा : 

महिलांसाठी आनंदाची बातमी, लाडकी बहीण योजनेचे या दिवशी खात्यात पैसे येणार

 

Share this article