पेरमध्ये व्हिटॅमिन्स, मिनिरल्स, नियासिन, फॉलेट, कार्ब्स आणि फायबरसाखी पोषण तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. याशिवाय पेरमध्ये अँटी-इंफ्लेमेंटरी व अँटी कॅन्सर गुणधर्म असतात.
पेरमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. यामुळे वजन कमी होण्यासह कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होतो. याच्या सेवनाने मेटाबॉलिज्म बूस्ट होतो.
पेरच्या सेवनाने बद्धकोष्ठता आणि अपचनासारख्या समस्या दूर होतात. याशिवाय गॅस, अॅसिडिटीही दूर होते.
पेरमध्ये व्हिटॅमिन सी असल्याने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होण्यास मदत होते.
शरिरातील बॅड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करत गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यास पेर मदत करते. पेरमध्ये असलेल्या पोटॅशिअममुळे हृदयाचे आरोग्य राखण्यासही फायदा होतो.
पेर शरिरात अँटी-ऑक्सिडेंट्सच्या रुपात काम करते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन-के भरपूर प्रमाणात असल्याने शरिराला आलेली सूज कमी होण्यास मदत होते.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेर फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेल्या अँटी-ऑक्सिडेंटमुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.
पेरमध्ये कॅल्शिअमचा उत्तम स्रोत असतो. यामुळे हाडांना बळकटी मिळण्यास पेर फायदेशीर ठरू शकते.