रीलच्या नादात सुमारे 300 फूट खोल दरीत पडून रील स्टार अन्वी कामदारचा मृत्यू

Reel Star Aanvi Kamdar : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कुंभे धबधबा येथे ही घटना घडली आहे.

 

Rameshwar Gavhane | Published : Jul 18, 2024 7:10 AM IST

Reel Star Aanvi Kamdar : मुंबईतील तरूणीचा इन्स्टाग्रामसाठी रील करताना दरीत पडून मृत्यू झाला. ही घटना रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कुंभे धबधबा येथे घडली. अन्वी कामदार असे या रील स्टार तरूणीचे नाव आहे. व्यवसायाने ती सीए आहे. सोशल मीडियावर रील स्टार म्हणून तिने स्वत:ची ओळख निर्माण केली होती.

 

 

अन्वी कामदार सात सहकाऱ्यांसह केली होती वर्षा पर्यटनाला

रील स्टार अन्वी आणि तिचे सात सहकारी माणगाव तालुक्यातील कुंभे येथे वर्षा पर्यटनासाठी गेले होते. यावेळी सोशल मीडिया प्लॅटफार्म इन्टाग्रामसाठी व्हिडिओ बनवण्यासाठी अन्वी एका कठड्यावर उभारून व्हिडिओ बनवत होती. यावेळी कठड्यावरून तोल गेल्यामुळे ती सुमारे 300 फूट दरीत कोसळली. या घटनेची माहिती अन्वीच्या सहकाऱ्यांनी माणगाव पोलीस ठाण्यात कळवली. ही माहिती समजताच माणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत त्यांनी स्थानिक बचाव पथकांना पाचारण केले. मात्र दरी खोल असल्याने बचावकार्यात अडचणी आल्या.

यानंतर घटनास्थळी कोलाड, माणगाव, महाड येथून प्रशिक्षित बचाव पथकांना पाचारण करण्यात आले. दोरीचा आधार घेत ही बचाव पथके दरीत उतरली. यावेळी अन्वी गंभीर जखमी अवस्थेत बचाव पथकाना दिसली. यावेळी बचाव पथकांनी तिला स्ट्रेचरच्या साह्याने दोरीचा आधार घेत तिला दरीतून बाहेर काढले. मात्र, माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता.

 

 

अन्वी कामदारच्या मृत्यूनंतर प्रशासनाचे पर्यटकांना आवाहन

रील स्टार अन्वी कामदार हिच्या दुर्दैवी मृत्यूनंतर माणगावचे पोलिस निरीक्षक, तहसीलदार आणि इतर स्थानिक अधिकाऱ्यांनी पर्यटक आणि आसपासच्या लोकांना आवाहन केले आहे. लोकांनी जबाबदारीने पर्यटनाचा आनंद घ्यावा. प्रवास करताना सुरक्षिततेला प्राधान्य द्या. पर्यटनस्थळी धोकादायक वर्तन टाळावे, अशा सूचना देत लोकांना सुरक्षित राहण्याचे व जीवाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा

प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरची आई मनोरमाला पुणे ग्रामीण पोलिसांनी केली अटक

 

Share this article