ओमराजे निंबाळकर यांनी मतदारसंघात काय केलं काम, लाखात बूथच्या कामाचं गणित सांगितलं समजून

Published : Jun 23, 2026, 05:40 PM IST
Omraje Nimbalkar

सार

ठाकरे गटातील खासदारांनी निधी मिळत नसल्याचा दावा करत बंडखोरी केली आहे. मात्र, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या मतदारसंघातील १८ कोटींच्या निधीचा हिशोब देत हे दावे खोडून काढले आहेत. त्यांनी निधी कसा खर्च झाला आणि एका बुथला किती पैसे मिळतात, याची सविस्तर माहिती दिली.

ठाकरे यांच्या सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर संपूर्ण राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. या सर्वांनी विकास काम होत नव्हती, निधी मिळत नव्हता अशी कारण दिली आहेत. जनतेच्या हितासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही हा निर्णय घेतल्याचं या खासदारांनी स्पष्ट केलं आहे. ओमराजे निंबाळकर यांनी खासदार निधीतून मिळालेली माहिती दिली आहे.

काय म्हणाले ओमराजे निंबाळकर? 

खासदार निधीवरून ओमराजे निंबाळकर यांनी माहिती दिली आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात १८ कोटी रुपये निधी मिळाल्याचं सांगितलं आहे. त्यातून त्यांनी १३० कामे प्रस्तावित असून त्यातली २१ काम पूर्ण झाली असल्याचं माहिती दिली. त्या सर्व कामांचा निधी वितरित केल्याचं ओमराजे यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.

निधीतील एकही रुपया शिल्लक राहिला नाही 

मला मिळालेल्या निधीतील एकही रुपया शिल्लक राहिला नसल्याची माहिती ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. खासदार निधीवरून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जात आहे. खासदार निधी खर्च करण्याची मुदत हि ५ वर्षांची असते. त्या मुदतीत निधी खर्च झालाय का नाही हे आपण आधी तपासून पहिला हवं असं त्यांनी म्हटलं आहे.

एक लाखात किती काम होते? 

खासदाराला वर्षभरात पाच कोटींचा निधी मिळतो असं यावेळी बोलताना ओमराजे यांनी सांगितलं आहे. माझ्या मतदारसंघात २४७५ बूथची संख्या आहे. एका बूथला १ लाख ३००० रुपये मिळते. एका लाखात कोणते काम होते हे त्यांनी यावेळी विचारलं आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Abhijeet Dipke: आजीचं निधन, तरीही अभिजीत डिपके पोलिसांच्या ताब्यात; CJP कडून सुटकेची मागणी
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल