Pune : लोहगडावरुन पडून मृत्यू नाही, तिने त्याला संपवलं

Published : Jun 23, 2026, 11:23 AM ISTUpdated : Jun 23, 2026, 12:07 PM IST
Ketan Agarawal

सार

Pune News : लोहगडावरुन पडून मृत्यू झाल्यालेल्या केतन अग्रवालच्या प्रकरणात एक मोठे अपडेट समोर आले आहे. याबाबत पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.

 Pune News :  पुण्यातील एका मोठ्या बिल्डरच्या मुलाचं नोव्हेंबर महिन्यात लग्न होतं, लग्नाची तयारीही सुरु होती, यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात होते. जयपूरला यासाठी पॅलेस बूक करण्यात आला होता. चार्टर्ड विमानाने पाहुणे मंडळीला नेण्यात येणार होते.लग्न जवळ येत होतं, त्याप्रमाणे दोन्ही परिवारात आनंदाचं वातावरण होतं. पण अचानक अशी घटना घडली की दोन्ही परिवारांना धक्का बसला. याच प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी केतनच्या मृत्यूबाबत एक धक्कादायक माहिती दिली आहे.

नक्की काय घडले?

लोहगडावर होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन आला होता. यावेळी पाय घसरुन केतन खोल दरीत खाली पडला. यामुळे प्रथमदर्शी असे दिसून आले की, केतनचा दुर्देवी मृत्यू झाला असावा. पण आता पोलिसांनी केलेल्या अधिक तपासानुसार एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतनचा मृत्यू पाय घसरुन झालेला नाही. तर पत्नीनेच मित्राच्या मदतीने केतनला दरीत ढकले. यामुळे केतनचा खून केल्याचा प्रकार तपासात उघड झाला आहे. खरंतर, केतनची होणारी पत्नी सिया हिला केतन पसंत नव्हता. यामुळे वाढदिवसाचे निमित्त साधत सियाने मित्राच्या मदतीने केतनचा काटा काढल्याचे समोर आले आहे. 

घटनेवेळी नेमके काय घडले?

केतन दरीत कोसळल्यानंतर सियाने मदतीसाठी हाक मारण्यास सुरुवात केली. लोहगडावर ट्रेकिंगसाठी आलेल्यांनी तातडीने याबद्दल लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनेची माहिती दिली. पोलिसांनी शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि मावळ वन्यजीवन पथकाची मदत घेतली. या दोन्ही टीमच्या माध्यमातून दरीत कोसळलेल्या केतनला बाहेर काढले. यावेळी केतनला गंभीर दुखापत झाली होती. केतनला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कोण आहे केतन अग्रवाल आणि सिया गोयल?

केतन अग्रवाल हा पुण्यातील तरुण व्यावसायिक होता. पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. तर सिया गोयल ही मार्केटयार्डातील मसल्याचे मोठे व्यापारी असलेल्या गोयल यांची मुलगी आहे.

लग्नासाठी कोट्यावधींचा खर्च

केतन आणि सिया यांचे नोव्हेंबर महिन्यात लग्न होणार होते. लग्नासाठी केतनच्या घरातील मंडळींनी जयपूरमध्ये आलिशान पॅलेस बुक केला होता. यासाठी 17 कोटींचा खर्च देखील केला. याशिवाय पाहुण्यांना जयपूरला घेऊन जाण्यासाठी चार्टड विमानाची सोयसुद्धा केली होती.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Abhijeet Dipke: आजीचं निधन, तरीही अभिजीत डिपके पोलिसांच्या ताब्यात; CJP कडून सुटकेची मागणी
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल