ऑपरेशन टायगर २ आणि ३ लवकरच होणार, शिंदे गटातील 'या' खासदाराच्या दाव्याने उडाली खळबळ

Published : Jun 23, 2026, 04:15 PM IST
eknath shinde and uddhav thackeray

सार

उद्धव ठाकरे गटातील ६ खासदारांनी निधी मिळत नसल्याच्या कारणावरून शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटाने याला 'ऑपरेशन टायगर'चे यश म्हटले असून, भविष्यात असे आणखी राजकीय भूकंप होण्याचे संकेत खासदार रवींद्र वायकर यांनी दिले आहेत.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर संकट थांबत नसल्याचं दिसून आलं आहे. शिंदे गटात ६ खासदार गेल्यामुळं आता ३ खासदार उबाठा गटात उरले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आम्ही जे करतो ते फुलप्रूफ करतो असं म्हटल्यानं एकच खळबळ उडाली. पुढील निवडणुकीत हे ६ खासदार धनुष्यबाण चिन्हावर लढतील आणि निवडून येतील असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

खासदार रवींद्र वायकर काय म्हणाले? 

खासदारांच्या पक्षप्रवेशावर रवींद्र वायकर यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी मोठा भूकंप होणार आहे. त्यांनी थोडक्यात पुढच्या टप्यात होणाऱ्या ऑपरेशन टायगरचे संकेत दिले आहे. पहिलं ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर दुसरं आणि तिसरं ऑपरेशन लवकरच पार पडणार आहे. सर्व विषयाकडे सर्व बाजूनी पाहण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

विकास काम होणं गरजेचं 

काम पूर्ण होणं महत्वाचं असून त्यानुसार प्रक्रिया पुढं सुरु आहे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. सर्व पैलू विचारात घेणं महत्वाचे असते. ऑपरेशन टायगर एक झाले, दोन झाले. आता विकास काम होणं आवश्यक आहे. ज्यांना वाटत काम व्हावीत, त्यांनी आमच्याकडं यावं. मिशन टायगर २, ३ यापुढं पण होईल. खासदारांनी निधी मिळत नसल्यामुळं काम होत नसल्याचं खासदारांनी म्हटलं आहे.

खासदारांनी पक्षप्रवेशावर काय कारण दिलं? 

शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील या सर्व खासदारांनी मतदारसंघाच्या कामासाठी पैसे मिळत नसल्याचं कारण दिलं . या खासदार निधी वाटपाच्या वादावर आणि आणि आकडेवारीवर वायकर यांनी मत व्यक्त केलं आहे.

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Abhijeet Dipke: आजीचं निधन, तरीही अभिजीत डिपके पोलिसांच्या ताब्यात; CJP कडून सुटकेची मागणी
Viral Video : भिवंडीत गुलाबजामच्या पाकात सापडला उंदीर, व्हिडिओ व्हायरल