एकीकडे उन्हाचे चटके बसणार आणि दुसरीकडे धो धो पाऊस कोसळणार, हवामान विभागाने वर्तवला भीतीदायक अंदाज

Published : Oct 09, 2025, 10:18 AM IST

हवामान अंदाज: महाराष्ट्रामध्ये पुढील दोन-तीन दिवसांत मान्सून परतण्याची शक्यता असून दक्षिणेकडून एक कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे अवकाळी पावसाचे संकट येऊ शकते.

PREV
16
एकीकडे उन्हाचे चटके बसणार आणि दुसरीकडे धो धो पाऊस कोसळणार, हवामान विभागाने वर्तवला भीतीदायक अंदाज

महाराष्ट्रात पुढच्या दोन ते तीन दिवसांत मान्सून परतण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात मागच्या २४ तासात विशेष पावसाची नोंद करण्यात आली आहे. अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळाचा प्रभाव कमी झाला आहे.

26
दक्षिणेकडून महाराष्ट्रावर मोठं संकट येणार

दक्षिणेकडून एक कमी दाबाचा पत्ता तयार झाल्याची माहिती हवामान विभागाच्या देण्यात आली आहे. त्याची तर्फ लाईन महाराष्ट्रापर्यंत येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

36
पुढचे ४८ तासात होणार मोठे बदल

पुढच्या ४८ तासात मोठे बदल होणार असून त्यामुळं वातावरणात बदल होणार आहे. कमी दाबाचा पट्टा वाढला की अवकाळी पावसाचं संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

46
हवामान सतत बदलतंय

पश्चिम बंगालच्या खाडीतून वरच्या बाजूला सेवन सिस्टरच्या दिशेने दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झालं आहे. त्यामुळं तिकडून येणारे वारे आणि दक्षिणेकडून येणारे वारे यामुळे हवामान सतत बदलत आहे.

56
डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात थंडी राहणार

ला नीना वादळामुळे थंडी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे डिसेंबर ते फेब्रुवारी या दोन महिन्यांमध्ये थंडी जास्त राहण्याची शक्यता आहे. कधी हलक्या पावसाच्या सरी तर कधी उकाडा त्यामुळं नागरिक हैराण झाले आहेत.

66
विकेंडला उन्हाचे चटके बसणार

विकेंडला उन्हाचे चटके बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मे महिन्यासारखी परिस्थिती ऑक्टोबर महिन्यात उद्भवू शकते. नागरिकांना काळजी घेण्याचं अवाहन करण्यात आलं असून कोकणात पावसाची जास्त शक्यता आहे.

Read more Photos on

Recommended Stories