Ladki Bahin Yojana: मोठी दिवाळी भेट! KYC नसली तरी सप्टेंबरचा हप्ता लाडक्या बहि‍णींच्या खात्यात जमा होणार, 'या' दोन दिवसांत पैसे मिळणार!

Published : Oct 08, 2025, 11:18 PM IST

Ladki Bahin Yojana: सरकारने 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थी महिलांसाठी दिवाळीपूर्वी मोठी घोषणा केली. तांत्रिक अडचणींमुळे KYC प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली असून, सप्टेंबर महिन्याचा हप्ता KYC पूर्ण न झालेल्या महिलांच्या खात्यातही जमा केला जाणारय. 

PREV
15
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी

मुंबई: महायुती सरकारने मोठ्या उत्साहाने सुरू केलेल्या 'लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. दिवाळी सण अगदी तोंडावर आल्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातील सर्व भगिनींचे लक्ष लागले होते. अखेर सरकारकडून याबाबत स्पष्ट सूचना मिळाली आहे. 

25
सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होणार

मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. महायुती सरकारने यासंदर्भात आदेश जारी केला असून, १३ ते १५ ऑक्टोबरपर्यंत हा हप्ता खात्यात जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. दिवाळीच्या तोंडावर हा निधी मिळाल्याने महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

35
KYC नसले तरी मिळणार हप्ता! मोठा दिलासा

योजनेसाठी आवश्यक असलेली KYC प्रक्रिया सध्या तांत्रिक अडचणींमुळे थांबलेली आहे. अनेक महिलांना e-KYC करताना OTP (One Time Password) मिळत नसल्याने समस्या येत होत्या. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनीही याची गंभीर दखल घेतली होती.

या तांत्रिक समस्येमुळे लाखो महिलांना पडताळणी प्रक्रियेतून जावे लागत होते. मात्र, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांना मोठा दिलासा देत सरकारने KYC च्या अटीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

45
वेबसाईट सुरळीत झाल्यास सर्व महिलांना e-KYC करणे अनिवार्य

सध्या लाडकी बहीण योजनेची वेबसाईट पूर्णपणे सुरळीत नसल्यामुळे, KYC ची अट तूर्तास शिथिल करण्यात आली आहे. म्हणजेच, ज्या महिलांची KYC झाली आहे किंवा झालेली नाही, त्या सर्व पात्र भगिनींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात मिळणार आहे. सध्या ही अट तात्पुरती वगळण्यात आली असली तरी, वेबसाईट पूर्णपणे सुरळीत झाल्यावर सर्व महिलांना KYC करणे अनिवार्य राहील. 

55
OTP समस्येमुळे KYC ला तात्पुरता ब्रेक

e-KYC करताना OTP न येण्याची तांत्रिक अडचण अजूनही कायम आहे. सरकारने युद्धपातळीवर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असले तरी, ही समस्या अजूनही दूर झालेली नाही. त्यामुळे दिवाळीच्या अगदी जवळ असताना सरकारने तात्पुरत्या स्वरूपात KYC प्रक्रियेला ब्रेक देऊन थेट हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे 'लाडकी बहीण' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories