जळगावच्या पाळधी गावात दोन गटात राडा; वाहने आणि दुकाने जाळली, संचारबंदी लागू

Published : Jan 01, 2025, 12:43 PM ISTUpdated : Jan 01, 2025, 12:58 PM IST
Jalgaon

सार

जळगाव जिल्ह्यातील पाळधी गावात मंत्री गुलाबराव पाटील यांचे समर्थक आणि स्थानिक लोकांमध्ये हाणामारी झाली. यानंतर जमावाने ६ वाहने आणि १३ दुकाने पेटवून दिली. या घटनेनंतर जळगावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

जळगाव: ३१ डिसेंबरच्या रात्री जळगाव येथील पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांचे समर्थक आणि स्थानिक लोकांमध्ये हाणामारी झाली. यानंतर जमावाने ६ वाहने आणि १३ दुकाने पेटवून दिली. रात्री उशिरा अग्निशमन दलाने आग विझवली. यानंतर जळगावात २ जानेवारीला सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

वृत्तानुसार, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या गाडीतून त्यांचे कुटुंबीय नवीन वर्षाच्या समारंभासाठी गेले होते. हॉर्न वाजवल्यानंतर आणि कारची धडक लागल्याने चालकाने गावकऱ्यांशी वाद घातला. याचा राग आल्याने गावातील काही तरुणांनी चालकास शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे. वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिवीगाळ करणाऱ्या तरुणांवर काही शिवसैनिक धावून गेले. मारामारीचे वृत्त समजताच गावातील काही लोक व शिवसेना कार्यकर्तेही आले. यानंतर तेथे उभी असलेली वाहने आणि दुकाने जाळण्यात आली. पोलिसांनी २५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

८ आरोपी ताब्यात, चौकशी सुरू

पोलिसांनी ८ जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी सांगितले की, धरणगाव पोलीस ठाण्यात २० ते २५ अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावातील अनेक भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आणखी वाचा-

वाल्मिक कराडला १४ दिवसांची सीआयडी कोठडी

समृद्धी महामार्गावर ५० हून अधिक वाहनांचे टायर पंक्चर; नेमकं काय घडलं?

PREV

Recommended Stories

तिकीट बुक करा! मराठवाड्यासाठी रेल्वेच्या ३ स्पेशल गाड्या सुरू; कुठून-कधी सुटणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर!
अरुंद एक्झिट, ताडाच्या पानांची रचना, मोठी DJ नाईट गोव्याच्या नाईटक्लबमधील किंकाळ्यांना जबाबदार!