
पुण्यातील कोंढवा येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील तरुणीचे नवे कारनामे समोर आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणातील संशयित आरोपी तरुणाला अटक न करता पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तपासात सहकार्य करणे आणि पोलिसांनी बोलावल्यास ठाण्यात हजर राहण्याच्या अटीसह ही नोटीस देण्यात आल्याची माहिती उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली.
तरुणीच्या तक्रारीनुसार आरोपी मुलगा कुरिअर बॉय म्हणून घरात शिरला आणि त्याच्या तोंडावर स्प्रे मारला होता. मात्र या तपासात वेगळ्याच बाबी उघडकीस झाल्या आहेत. पोलिसांनी चौकशी केल्यावर ती मुलगी त्या मुलाला ओळखत असल्याचं तिने कबुल केलं आहे. पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात मुलाने स्प्रे मारला नव्हता हे उघडकीस आलं आहे.
मुलान लिहिलेला मी परत येईन हा मेसेज मुलीने एडिट करून पोलिसांना दाखवल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी तरुणीचा खोटेपणा समोर आणला आहे. तिनेच फोन करून मुलाला घरी बोलावलं होत. पोलिसांनी आरोपीला एका लग्नातून अटक केली. त्यानंतर दोघांची समोरासमोर तपासणी केली आणि पालकांना माहिती दिली आहे.
नंतर आरोपीला चौकशी करून पोलिसांनी सोडून दिल आहे. मुलीने जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान अनेक नवीन गोष्टींचा उलगडा झाला आहे. ते नियमित एकमेकांना भेटायचे, दोघांमध्ये संभाषण असायचे. तरुणीनेच त्याला फोन करून घरी बोलावले होते, कुठलाही स्प्रे मारला नाही,' असे तपासात समोर आले; परंतु समाजात वेगळीच माहिती गेली आहे.