Lok Sabha Election 2024 : शरद पवारांच्या गटातील सात उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, जाणून घ्या सुप्रिया सुळेंना कोठून दिलेय तिकीट

Published : Apr 04, 2024, 07:13 PM IST
Sharad Pawar Supriya sule

सार

लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या गटाच्या उमेदवारांची आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीमध्ये सात उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Lok Sabha Election 2024 :  लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. याशिवाय राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेल्या उमेदवारांच्या नावाचीही घोषणा करत आहेत. अशातच नुकतीच शरद पवार यांचा पक्ष ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ (Nationalist Congress Party-Shardchandra Pawar) यांच्या उमेदवारांची दुसरी यादी गुरुवारी (4 एप्रिल) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सुप्रिया सुळेंना (Supriy Sule) निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.

सात जागांसाठी उमेदवारांची यादी जाहीर
शरद पवार यांच्या गटाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये सात जागांसाठी उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतवरण्यात आले आहे.

  • वर्धा - श्री. अमर काळे
  • दिंडोरी - श्री. भास्कर भगरे
  • बारामती - सौ. सुप्रिया सुळे
  • शिरूर - डॉ. अमोल कोल्हे
  • अहमदनगर - श्री. निलेश लंके
  • बीड - श्री. बजरंग सोनावणे
  • भिवंडी - श्री. सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे

भिवंडीतील अखेर तिढा सुटला
भिवंडी येथील लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि शरद पवारांच्या गटामध्ये वाद सुरू होता. अखेर भिवंडीच्या जागेवरून शरद पवार यांनी बाळ्यामामा म्हात्रे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. या जागेवरून आता बाळ्यामामा म्हात्रे विरूद्ध भाजपचे उमेदवार कपिल पाटील अशी लढत होणार आहे.

सात टप्प्यात होणार निवडणूक
देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 19 एप्रिलला मतदान होणार आहे. यानंतर 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जूनला मतदान होणार आहे. मतदानाचे निकाल 4 जूनला जाहीर केले जाणार आहेत.

आणखी वाचा : 

नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय, निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर संजय निरुपम आज करणार मोठी घोषणा, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत करणार एण्ट्री?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवेदिता माने उभ्या राहणार? राजू शेट्टींच्या विरोधात होणार लढत

PREV

Recommended Stories

अपघाताची बातमी वाचून डोळ्यापुढं येतील अंधाऱ्या, गोंदियातील अपघातात तिघांचा जागीच मृत्यू; ४० पेक्षा जास्त प्रवासी जखमी
Indigo Update : आजही शुक्रवारी शेकडो उड्डाणे रद्द, मुंबई-पुणे-नागपूरसह प्रमुख विमानतळांवर गोंधळ