राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार यांच्या गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. यावरुन राजकरण तापले आहे. अशातच संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या सत्कारावरुन प्रश्न उपस्थितीत केलेत.
Sanjay Raut on Deputy CM Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार यांच्या गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. यावरुन राजकरण तापले आहे. अशातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटातील राज्यसभेचे सदस्य संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कारावरुन काही प्रश्न उपस्थितीत केले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (11 फेब्रुवारी) दिल्लीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. यावर महाराष्ट्रातील राजकरण चांगलेच तापले गेले. बुधवारी (12 फेब्रुवारी) उद्धव ठाकरे गटाने यावरुन नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी म्हटले की, “उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनीच अमित शाह यांच्या मदतीने शिवसेना मोडली. त्यांचा सत्कार करणे म्हणजे भाजपाच्या नेत्यांचा सत्कार करण्यासारखे आहे. ज्याला आम्ही महाराष्ट्राचे दुश्मन समजतो त्यांचा असा सत्कार करणे महाराष्ट्राच्या गौरवाला लाजवणारी गोष्ट आहे.”
यापुढेही राऊत यांनी म्हटले की, “शरद पवारांनी या सत्कार सोहळ्यात सहभागी व्हायला नको होते. कारण उपमुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एमवीए सरकार पाडले होते. यावेळी संजय राऊतांनी प्रश्न उपस्थितीत करत म्हटले की, तुम्हाला माहितेय का हा पुरस्कार कोणी दिला? राजकीय नेत्यांना दिले जाणारे असे पुरस्कार एकतर खरेदी केले जातात किंवा विकले जातात.” दरम्यान, शरद पवारांच्या गटाने 11 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित केले होते. हा पुरस्कार 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनात दिला गेला होता.
हेही वाचा :
महाराष्ट्र निवडणूक: ९.७ कोटी मते, राहुल गांधींचा आरोप
सरकारी-निमसरकारी ऑफिसमध्ये मराठी भाषा अनिवार्य, फडणवीस सरकारचा निर्णय
राजकीय कार्यक्रम नव्हता
शरद पवारांच्या गटाने प्रतिक्रिया देत म्हटले की, “पुरस्काराचा सोहळा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता तर साहित्याचा कार्यक्रम होता. खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले की, राऊत हे त्यांचे खासगी मत व्यक्त करू शकतात. हा अखिल भारतीय मराठी साहित्य सन्मेलनाचा एक भाग होता. प्रत्येक गोष्टीमध्ये राजकरण आणू नये. यामुळे मला वाटत नाही की, यामध्ये काही चुकीचे आहे.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिउत्तर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना प्रतिउत्तर देत म्हटले की, "टीका करणाऱ्यांचे संतुलन बिघडले आहे. त्यांना द्वेषाने पछाडले आहे. आतापर्यंत त्यांना शरद पवार वंदनीय वाटत होते पण त्यांनी माझा सत्कार केल्यानंतरही राऊतांनी पवारांचाही अपमान केला."