सरकारी-निमसरकारी ऑफिसमध्ये मराठी भाषा अनिवार्य, फडणवीस सरकारचा निर्णय
Maharashtra Feb 04 2025
Author: Rameshwar Gavhane Image Credits:Our own
Marathi
फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय, मराठी भाषा अनिवार्य!
फडणवीस सरकारने घेतला ऐतिहासिक निर्णय! राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
Image credits: Our own
Marathi
राज्य सरकारचा धोरण मसुदा स्वीकारला!
मंत्रिमंडळाने महाराष्ट्र राज्याच्या मराठी भाषा धोरणाच्या मसुद्याला मान्यता दिली. आता सरकारी कार्यवाहीमध्ये मराठीचा वापर बंधनकारक होईल.
Image credits: social media
Marathi
सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मराठीत संवाद!
सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठीत संवाद साधणे अनिवार्य होईल. फलक आणि नोटिस बोर्ड देखील मराठीत असतील.
Image credits: Getty
Marathi
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नवा नियम!
मराठीत संवाद न करणारा शासकीय कर्मचारी दोषी ठरल्यास शिस्तभंगाची कारवाई होईल. मराठी भाषेचा आदर आणि वापर सुनिश्चित करणे अनिवार्य!
Image credits: Getty
Marathi
सर्व प्रकारची सादरीकरणे व आदेश मराठीत!
सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मूळ प्रस्ताव, पत्रव्यवहार, आदेश आणि सादरीकरणे मराठीतच असतील. राज्याच्या माहितीचा प्रवाह मराठीत!
Image credits: Getty
Marathi
केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्येही मराठी!
केंद्र सरकारच्या कार्यालयांचे सूचनाफलक, अधिकाऱ्यांचे नामफलक आणि अर्ज नमुने देखील मराठीत असतील. केंद्र सरकारनेही मराठी भाषा स्वीकारली आहे.
Image credits: Getty
Marathi
उद्योगांतील जाहिराती देखील मराठीत!
शासनाच्या उपक्रमाद्वारे उद्योगांकडून दिल्या जाणाऱ्या जाहिराती आणि वृतपत्रातील निविदा, सूचना सर्व मराठीत दिल्या जातील. मराठीचा प्रचार आणि प्रसार होत राहील!