School Holiday Alert: महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे रायगड, सातारा, लोणावळा, पालघरसह अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा आणि कॉलेजमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
मुंबई : राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे, अनेक जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी काही जिल्ह्यांतील शाळा-कॉलेज उद्याही बंद राहणार आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी सोमवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, काही जिल्ह्यांमध्ये अजूनही रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामुळेच जिल्हा प्रशासनांनी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तुमच्या शहरात सुट्टी आहे की नाही, ते खालील माहितीमध्ये सविस्तर वाचा.
210
या जिल्ह्यांमध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी
रायगड
रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सरकारी, खासगी शाळा, महाविद्यालये आणि इतर शिक्षण संस्थांना उद्या २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
310
सातारा
जिल्ह्यातील ६ तालुक्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट असल्यामुळे, पाटण, जावळी, वाई, महाबळेश्वर, कराड आणि सातारा या तालुक्यांतील शाळांना २० आणि २१ ऑगस्ट अशा दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. इतर तालुक्यांमध्ये पावसाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी लोणावळा नगर परिषदेने शहरातील सर्व शाळांना पुढील दोन दिवसांसाठी सुट्टी जाहीर केली आहे.
510
पालघर
पालघर जिल्ह्यातही उद्या मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सलग दुसऱ्या दिवशी सुट्टी दिली आहे.
610
पावसाचा अलर्ट आणि प्रभावित जिल्हे
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे.
710
रेड अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा.
810
ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा, आणि गडचिरोली.