मुंबईत दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता; रेड अलर्ट जारी, नागरिकांना काळजी घेण्याचं केलं आवाहन

Published : Aug 19, 2025, 08:20 AM IST

मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवारसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

PREV
17
मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता; रेड अलर्ट जारी, नागरिकांना काळजी घेण्याचं केलं आवाहन

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे चाकरमान्यांचे हाल होत असून लोकल उशिराने धावत आहे.

27
मुंबईत जोरदार पावसाळा सुरुवात

मागील काही दिवसांपासून पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीला सुरुवात झाली असून आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दोन दिवस बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांसाठी हवामान खात्याने जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान खात्याच्या वतीने देण्यात आली आहे.

37
शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

आज अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर उपनगरात देखील रेड अलर्ट जारी केला आहे.

47
रेड अलर्ट कोठे दाखवण्यात आलं?

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट या भागात पावसाने रेड अलर्ट दिला. कोल्हापूर घाट आणि गडचिरोली या भागातही रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर वरुणराजा चांगला बरसत आहे.

57
ऑरेंज अलर्ट कोठे दाखवण्यात आला आहे?

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट हा सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, गडचिरोली या ठिकाणी हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला.

67
येलो अलर्ट कोठे?

सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे शहर, कोल्हापूर, गडचिरोली, तसेच मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्हे. या ठिकाणी हवामान विभागाच्या वतीने येलो अलर्ट देण्यात आला आहे.

77
कोकणात अतिवृष्टीला सुरुवात

राज्यातील अनेक भागांमध्ये आज मुसळधार पाऊस पडणार असून मुंबई, ठाणे, पालघरसह नवी मुंबई, रायगड, मीरा भाईंदर, पनवेल आणि रत्नागिरीतल्या शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

Read more Photos on

Recommended Stories