महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून कोकणात अतिवृष्टी पडत आहे. मुंबईसह अनेक भागात पाणी साचले असून, पुढील तीन-चार दिवस अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला रेड अलर्ट जारी.
महाराष्ट्रात पुढील ४ दिवस अतिवृष्टी होणार, मुंबईतील अनेक भागांमध्ये साचलं पाणी
मुसळधार पडत असणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीला उशीर होत असून अनेक शाळांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
26
कोकण आणि मराठवाड्यात पावसाची संततधार सुरु
आज सकाळपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कोकणात अतिवृष्टी पडत असून किनारपट्टीवरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात जोरदार पाऊस बरसत आहे.
36
मुंबईत अनेक भागांमध्ये साचलं पाणी
मुंबईतील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. या साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उभा राहिला आहे. पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्र जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
46
मुंबई शहर आणि उपनगरात होणार अतिवृष्टी
मुंबई शहर आणि उपनगरात अतिवृष्टी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
56
महाराष्ट्रात रेड अलर्ट कोठे?
नाशिक, पुणे आणि साताऱ्याच्या घाट परिसराला देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर कोल्हापूरच्या घाट भागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
66
काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली वगळता इतर सर्व जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व पाचही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.