
शेतीच कोणतंही काम करण्यासाठी ७/१२ ची गरज असते, एक ऑगस्टपासून आता ऑफलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज काढता येणार नाही. नागरिकांनी ऑनलाईन अर्ज केल्यास त्याची नोंद ठेवणं सोपं जाणार आहे. त्यामुळे एक ऑगस्टपासून आता या सुविधेचा शेतकऱ्यांना फायदा घेता येणार आहे. कलम १५५च्या नियमाचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात होता.
अनेकवेळा तहसीलदारांकडून नागरिकांची फसवणूक होत असायची पण आता ऑनलाईन पद्धतीमुळे फसवणूक टाळण्याची शक्यता वाढली आहे. कलम १५५ नुसार आपल्याला नावातील दुरुस्ती करताय येऊ शकणार आहे. मात्र फेरफारमध्ये चुकीचे नाव आल्यास आपण आपल्याला या कलमानुसार त्याची दुरुस्ती करता येऊ शकणार आहे.
कलम १५५ मध्ये तलाठी, तहसीलदार अशा सरकारी अधिकाऱ्यांकडून झालेल्या चुका दुरुस्त करता येणार आहेत. आपल्याला या चुका दुरुस्त करताना कागदपत्रे आवश्यक आहेत. या कलमाचा उपयोग करून आपण खाते दुरुस्ती, फेरफार दुरुस्ती आणि इतर नोंदीमधील चुका दुरुस्त करणे आवश्यक आहे. येत्या एक ऑगस्टपासून आपण ऑनलाईन अर्ज शिकू शकणार आहेत.