
अमरावतीमध्ये एक भयानक घटना घडल्याचे समोर आलं आहे. येथे चक्क एका पोलीस उपनिरीक्षकाची हत्या करण्यात आली. पोलीस असलेल्या दोन चाकी गाडीला एका फोर व्हीलरने धडक दिली आणि नंतर त्यांच्या पोटावर आणि छातीवर एका धारधार शस्राने सपासप वार करण्यात आले. पोलिसांचीच हत्या होत असेल तर आता सर्वसामान्य लोकांनी कोणाकडे पाहायचं हा प्रश्न समाजात निर्माण झाला आहे.
अब्दुल कलाम अब्दुल कादर असं हत्या करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. अमरावती पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये ते काम करत होते. दुचाकीवरून जात असताना त्यांना एका चार चाकी गाडीनं उडवलं आणि नंतर पाच ते शहा हल्लेखोरांनी त्यांच्यावर एका धारदार हत्याराने वार केले.
पीएसआयला गंभीर जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते पण तिथं गेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी हल्लेखोरांना पकडण्यासाठी दोन पोलीस पथके रवाना केली आहेत. हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामान्य जनतेतून केली जात आहे.