
बीड जिल्ह्यात दर महिन्याला खून, अपहरण, बलात्कार अशा घटना घडताना दिसून येत आहेत. अकरावीच्या वर्गातील विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या दोन शिक्षकांना पोलिसांनी अटक केली आहे. विजय पवार आणि प्रशांत खटोकर असे दोन शिक्षकांचे नाव असून त्यांना बीड जिल्ह्यातील मांजरसुभा परिसरातून अटक केली.
पीडित मुलगी नामांकित उमाकरण शैक्षणिक संकुल या ठिकाणी शिक्षण घेत होती. त्या मुलीचा 30 जुलै 2024 ते 25 मे 2025 दरम्यान या दोन शिक्षकांनी लैंगिक छळ केला. तिला नग्न करून आपल्या मोबाईल मध्ये दोघांनी फोटो काढल्याचा धक्कादायक प्रकारे समोर आला आहे याप्रकरणी 26 जून रोजी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही घटना उघडकीस आल्यानंतर दोनही आरोपी फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पोलीस पथक रवाना करण्यात आली होती. अखेर या दोन्ही शिक्षकांना बीड जिल्ह्यातच बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कौवत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या पोलीस पथकाने केली.