Sangli Accident News : सांगलीत कॅनलमध्ये कोसळून झाला भीषण अपघात, जागीच सहा जणांचा मृत्यू

Published : May 29, 2024, 10:09 AM IST
सांगली अपघात फोटो

सार

सांगली जिल्ह्यात भीषण अपघात घडला असून यामध्ये जागीच सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अल्टो गाडीचा रात्रीच्या वेळी दीड वाजता कॅनलला धडकून भीषण अपघात झाला, अपघात एवढा भीषण होता की गाडीतील सहा जणांचा मृत्यू जागीच झाला आहे. 

महाराष्ट्रामध्ये अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नाही. सांगली जिल्ह्यातील तासगाव - मणेराजूरी मार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. कार भरधाव असल्यामुळे या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले आहे. अल्टो कार डायरेक्ट कॅनलमध्ये जाऊन आढळल्यामुळे गाडीतील सहा जणांचा मृत्यू झाला. 

कुटुंबातील व्यक्ती सर्व एकाच कुटुंबातील - 
कुटुंबातील सर्व व्यक्ती एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्व कुटुंबातील सदस्य तासगाव येथील अल्टो कारमध्ये एकूण सात सदस्य असल्याचे सांगण्यात आले आहे. मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील-भोसले कुटुंबीय तासगाव येथून वाढदिवसावरून कवठेमहांकाळ येथील कोकळे गावात गेले होते. येथून परत येत असताना हा अपघात घडला आहे. चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला. या दुर्घटनेतील अपघातात तीन बालकांचा मृत्यू झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच येथील ग्रामस्थांनी मदतकार्याला सुरुवात केली होती. जखमी महिलेला उपचारासाठी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृत व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आले. या मृत झालेल्या व्यक्तींबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. हा अपघात रात्री झाल्यानंतर याबद्दलची माहिती कोणालाही कळली नव्हती, त्यामुळे या अपघातग्रस्तांपर्यंत मदत पोहचू शकली नाही. 

एका व्यक्तीमुळे पोहचली मदत - 
पहाटे एका व्यक्तीला हा अपघात झाल्याची माहिती समजताच येथे ग्रामस्थांनी धाव घेतली आणि अपघातग्रस्त नागरिकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. पण शेवटी हे प्रयत्न व्यर्थ ठरले असून सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर अवस्थेत जखमी झालेले आढळून आले. 

दुर्घटनेतील मृतांची नावे खालीलप्रमाणे

मयत नावे

  • राजेंद्र जगन्नाथ पाटील - वय 60
  • सुजाता राजेंद्र पाटील -वय 55
  • प्रियांका अवधूत खराडे वय 30 वर्ष (बुधगाव)
  • ध्रुवा- वय 3 वर्ष
  • कार्तिकी- वय 1 वर्ष
  • राजवी- वय 2 वर्ष

आणखी वाचा - 
Pune Porsche Accident : तुला पाहिजे तेवढे पैसे घे, मला मारू नकोस, धनिकपुत्राने प्रत्यक्षदर्शींना पैसे केले होते ऑफर
2 तासात 15 कॉल करून अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी डॉक्टरांना आणले दबावात, तपासात नवीन खुलासे आले समोर

PREV

Recommended Stories

Fire Department Vacancy : नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात जम्बो भरती! कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 186 पदांसाठी संधी, लगेच अर्ज करा
Mahavitaran Bharti 2025 : तरुणांसाठी सुवर्णसंधी! महावितरणमध्ये 300 पदांवर मेगाभरती, दीड लाखांपर्यंत पगार; अर्ज कसा कराल?