Pune Porsche Accident : तुला पाहिजे तेवढे पैसे घे, मला मारू नकोस, धनिकपुत्राने प्रत्यक्षदर्शींना पैसे केले होते ऑफर

पुणे अपघातस्थळी रोज नवीन घटना घडल्याचे दिसून येत आहे. घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार येथे अल्पवयीन आरोपीने उपस्थित असणाऱ्या लोकांना तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो, मला सोडून द्या असं म्हटल्याचे सांगितले आहे. 

vivek panmand | Published : May 29, 2024 2:49 AM IST

पुणे पोर्शे अपघात प्रकरणातील रोज नवीन खुलासे समोर येताना दिसून येत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला होता. येथे झालेल्या घटनेतील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी संपूर्ण प्रशासन कामाला लागल्याचे दिसून आले आहे. अल्पवयीन आरोपीला बाल सुधारगृहात पाठवल्यानंतर त्याच्या वडील आणि आजोबांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील दोन जणांनी जबाब दिल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. 

तुला पाहिजे तेवढे पैसे घे, मला मारू नकोस - 
घटना घडल्यानंतर एक प्रत्यक्षदर्शी दहा फूट अंतरावर रॉड ओलांडत होता. त्यावेळी रोड ओलांडत असताना त्याला ही घटना घडल्याचे समजले. मोठा आवाज झाल्यामुळे तो घटनास्थळी आला आणि आल्यावर त्याला ही घटना घडल्याचे दिसून आले. यावेळी आजूबाजूचे लोक जमा झाले होते आणि अल्पवयीन आरोपीला मारत होते. त्या वेळी तो तुला पाहिजे तेवढे पैसे घे, मला मारू नकोस. तुला पाहिजे तेवढे पैसे देतो, आताच देतो असं म्हणत असल्याचे त्याने सांगितले आहे. 

सीसीटीची कॅमेरे चेक केल्यानंतर प्रत्यक्षदर्शी हा रस्ता ओलांडत असल्याचे दिसून आले आहे. यावेळी दुसऱ्या बाजूला अपघात झाला असल्याचे कॅमेऱ्यात दिसून आले आहे. त्यामुळे प्रत्यक्षदर्शीने दिलेला जबाब हा ग्राह्य धरला जाऊ शकतो. अल्पवयीन आरोपीने पोर्शे गाडीने समोरील दुचाकीला उडवल्यामुळे दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीला घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांच्या हवाली केल्यानंतर दहा तासांनीच त्याला जामीनही मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर ही घटना संपूर्ण देशभरात चर्चेत आली आणि आरोपींवर कठोर कारवाईस सुरुवात झाली. 
आणखी वाचा - 
मुंबईसह कोकणात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही कोसळणार
शेतकऱ्यांनो पेरणीसाठी तयार रहा, 'या' तारखेला राज्यात मान्सूनचं होणार आगमन

Share this article