Pune Porsche Accident : कर्तव्यात दुर्लक्ष केल्याबद्दल दोन पोलिसांचे निलंबन, आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठपुराव्याला यश

Published : May 25, 2024, 08:13 AM IST
 Pune news

सार

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी येरवडा पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांचे निलंबन करण्यात आल्याची माहिती दिली आहे. त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

पोर्शे हिट अँड रन या पुणे येथे घडलेल्या घटनेशी संदर्भात रोज नवीन माहिती समोर येताना दिसून येत आहे. कर्तव्यात दुर्लक्ष केल्याबद्दल पुणे येथील येरवडा पोलीस स्टेशनमधील दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. शनिवारी रात्री वेगाने गाडी चालवल्यामुळे दोन आयटी अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर सामान्य जनता आणि लोकप्रतिनिधींनी हे प्रकरण उचलून धरले. 

पुणे आयुक्त अमितेश कुमार काय म्हणाले? - 
पुणे आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे की, "येरवडा पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांनी वायरलेस कंट्रोल रूमला अपघाताची माहिती न दिल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. यावर अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी म्हटले आहे की, या दोन अधिकाऱ्यांनी कंट्रोल रूमला अपघाताची लवकर माहिती दिली नाही. अपघाताच्या वेळी अल्पवयीन मुलगा गाडी चालवत नव्हता असे भासवण्याचा प्रयत्न केला असेही यावेळी पाटील यांनी म्हटले आहे. 

रक्ताचे नमुने घेण्यास झाला उशीर - 
आरोपीने दारू पिलेली असल्यामुळे त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. पण निलंबित झालेल्या अधिकाऱ्यांनी हे नमुने उशिरा घेतल्याचे लक्षात आले आहे. या घटनेबाबतची अधिकची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली नाही. अंतर्गत चौकशीमध्ये आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करत असताना अधिकाऱ्यांकडून चुकी झाल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. सदर घटनेच्या विरोधात कसबा येथील आमदार रवींद्र धंगेकर यांनी आवज उठवल्यामुळे या प्रकरणातील पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. यासंबंधीचे ट्विट टाकून त्यांनी याबद्दल लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. 
आणखी वाचा - 
अल्पवयीन मुलगा नाहीतर ड्रायव्हर चालवत होता गाडी, पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या मित्रांनी केला दावा
Pune Porsche Accident : हिट अँड रन केसमधील त्या अल्पवयीन मुलाच्या पित्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

PREV

Recommended Stories

Nashik Accident News : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात भीषण अपघात; संरक्षण कठडा तोडून इनोव्हा दरीत कोसळली, पाच जण ठार असल्याची भीती
Adiwasi Land Rules: आदिवासींची जमीन खरेदी-विक्री करता येते का? कायदा नेमकं काय सांगतो? जाणून घ्या महत्वाची माहिती