..."पुन्हा भेटुयात नव्या पोलीस स्टेशनचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन" म्हणत धंगेकरांचा पुणे पोलिसांवर घणाघात

Published : May 24, 2024, 06:29 PM IST
ravindra dhangekar and other photo

सार

पुण्यातील कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत धक्कादायक बाब नागरिकांच्या समोर आणली आहे. तसेच या पोस्ट द्वारे त्यांनी गृहमंत्र्यांना देखील याचा खुलासा करून दिला आहे. वाचा सविस्तर

पुण्यात मागील चार दिवसापूर्वी झालेल्या कल्याणीनगरमधील अपघात प्रकरणाची देशभरात चर्चा सुरु आहे. या अपघात प्रकरणात पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रसार माध्यमे, सामाजिक संघटना आणि विरोधकांकडून प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणात आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आपली भूमिका मांडली. पुणे पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद संपताच काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत ट्विट केले आहे.आता ट्विटवरून सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पुण्यातील कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत धक्कादायक बाब नागरिकांच्या समोर आणली आहे. तसेच या पोस्ट द्वारे त्यांनी गृहमंत्र्यांना देखील याचा खुलासा करून दिला आहे. जाणून घ्या काय आहे या पोस्टमधील खुलासा

धंगेकरांच्या ट्विटमध्ये काय ?

आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो. कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका झाल्या आहेत. त्यानंतर पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर कारवाई करणार…? असो, आजपासून मी तुम्हाला दररोज एका पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार आहे.

धंगेकरांनी शेअर केला मुंढवा पोलीस ठाण्यातील प्रकार :

आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुंढवा पोलीस ठाण्यातील प्रकार ट्विट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मुंढवा पोलीस स्टेशन अवघे ३ कर्मचारी चालवतात. त्यापैकी निलेश पालवे, काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स आणि हॉटेलमधून हप्ते गोळा करण्याचे काम करतात, असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. या आरोपासंदर्भात त्यांनी वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करताना कॉन्सटेबल असल्याचा दावा केला आहे.सोबत एक फोटो जोडत आहे ज्यात हे वसुली कॉन्स्टेबल #वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करतांना दिसून येत आहेत. आम्हा पुणेकरांच्या वतीने आपणांस विनंती आहे की,पुणे बिघडविणाऱ्या या पोलीस कॉन्स्टेबलची यांची तातडीने चौकशी करत यांना निलंबित करा ,अन्यथा 48 तासात यांचे इतर व्हिडिओ देखील असेच ट्विट करण्यात येतील.असे म्हणत त्यांनी इशारा देखील दिला आहे की, पुन्हा भेटुयात नव्या पोलीस स्टेशनचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन.

आणखी वाचा :

राज्याची परिस्थिती बिकट पण सरकार लक्ष देत नाही, शरद पवार यांनी दुष्काळाच्या मुद्यावरून सरकारवर केली टीका

तो येवल्यावाला म्हणतो की आम्ही एकत्र 60 टक्के आहोत, मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली टीका

PREV
Maharashtra News (महाराष्ट्र बातम्या): Read Maharashtra LIVE Updates and Latest Marathi News Today. Check महाराष्ट्र राजकीय बातम्या, महाराष्ट्र क्राईम न्यूज, महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज. Watch Maharashtra Viral News Videos, Photos, Maharashtra Weather Updates in Marathi at Asianet Marathi News.

Recommended Stories

Old Monk FSSAI Dispute : 'ओल्ड मंक'ला आता 'रम' म्हणता येणार नाही? FSSAI च्या अटीमुळे कंपनीला 500 कोटींचा फटका
Pune Crime : निगडीत मंदिरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, मेट्रो कामगार अटकेत