Pune Porsched Accident: 'ते दारु आणायला सांगायचे', वॉर्ड बॉयचे डॉ. अजय तावरेवर गंभीर आरोप

पुण्यातील अल्पवयीन मुलाच्या हिट अँड रन प्रकरणात आज तपास पथकाने ससून रुग्णालयात येऊन चौकशी केले असता आणखी गंभीर प्रकार समोर आले आहेत. मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी ससूनच्या दोन डॉक्टरांनी तीन लाख रुपये घेतल्याचं समोर आले आहे.

 

ससूनचे डॉक्टर अजय तावरेच्या अडचणीत वाढ झाली आहे. ससून हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी चौकशी समितीसमोर अजय तावरेची तक्रार केली आहे. अजय तावरे कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्ये दारू आणायला लावत होता. वडिलांच्या नावाने मला ससूनमध्ये काम करायला लावले. माझ्यासारख्या अपंगाला तावरेने त्रास दिला. सर्व शासनाकडे मी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. नाईट ड्युटीला असताना अजय चंदनवाले व अजय तावरे दारू आणायला सांगत होते. चौकशी समितीसमोर वॉर्ड बॉयने अजय तावरेचा तक्रारींचा पाढाच वाचला आहे. मला न्याय द्या नाहीतर मी आत्मदहन करेल असे ससूनचे वॉर्डबॉय नितीन सोनवणे यांनी म्हटले आहे.

ससून चौकशी समितीने आज ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी केली. अहवाल तयार करून राज्य सरकारला तो सादर केला जाणार आहे. ड्रिक अँड ड्राईव्ह प्रकरणात ससूनचे दोन डॉक्टर अटकेत आहे. ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार प्रकरणी ससूनच्या डॉक्टरांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. या प्रकरणी राज्य सरकारने तीन जणांची समिती नेमली आहे. यामध्ये डॉ. पल्लवी सापळे, डॉ. सुधीर चौधरी आणि डॉ. गजानन चव्हाण यांनी चौकशी केली.

आज दिवसभर चौकशी केल्यानंतर राज्य सरकारला हा त्याचा अहवाल पाठवला जाणार आहे. आपत्कालीन कक्षात जाऊन समिती अध्यक्ष डॉ. पल्लवी सापळे आणि पथकाने पाहणी केली. पोर्शे कार अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाला ससूनच्या ज्या कक्षात आणलं होतं त्याची पाहणी केली गेली. मेडिकल चेकअपची प्रोसिजर फॉलो करताना त्या मुलाची नोंदणी ज्या रजिस्टरमध्ये केली होती. त्यांच्या नोंदी चौकशी पथकाने घेतल्या. सोबतच ज्या बेडवर झोपवून त्याचे रक्ताचे नमुने घेतले. त्या बेडची,कक्षाची आणि तिथल्या सीसीटीव्हीची ही पाहणी पथकाने केली. ससून रुग्णालय चौकशी समितीने जवळपास 8 तास चौकशी केली. ससून रुग्णालयचे डिन डॉ विनायक काळे यांच्या केबिनमध्ये हे सगळे कामकाज सुरु होते. समितीकडून ससून रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ब्लड लॅबच्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात आली.

आणखी वाचा:

मुंबईसह कोकणात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही कोसळणार

 

 

Share this article