EY कंपनीतील महिला कर्मचाऱ्याचा Overwork मुळे मृत्यू, केंद्राकडून अधिक तपास सुरु

पुण्यातील एका 26 वर्षीय सीए तरुणीच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. तरुणीवर बॉसने कामाचा अधिक बोझा टाकल्याचा आरोप पीडितेच्या आईने लावला आहे. याच प्रकरणात केंद्र सरकारकडून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. 

महाराष्ट्रातील पुणे येथील हैराण करणारे एक प्रकरण समोर आले आहे. पुण्यातील एका मोठ्या अकाउंटिंग कंपनीत काम करणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणी कर्मचारीचा कामाच्या बोझ्यामुळे मृत्यू झाला आहे. तरुणीच्या मृत्यूचे प्रकरण तिच्या आईने कंपनीला लिहिलेल्या पत्रातून करण्यात आलेल्या खुलास्यातून समोर आले आहेत. तरुणीच्या आईने लिहिले की, तिच्या मुलीचा मृत्यू कामाच्या बोझ्यामुळे झाला आहे. या प्रकरणावर अधिक तपास केंद्राकडून सुरु करण्यात आला आहे.

नक्की काय आहे प्रकरण?
युकेमधील प्रोफेशनल सर्विस प्रोवाइडर कंपनी अर्न्स्ट अँड यंग म्हणजेच EY कंपनीत काम करणारी एना सेबेस्टियनचा मृत्यू झाल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. खरंतर, कामाचा तणाव आणि टॉक्सिक वातावण असणाऱ्या कंपनीत काम करत असल्याने एनाचा मृत्यू झाल्याचा आरोप लावला जात आहे. यासंबंधित तरुणीच्या आईने कंपनीला एक पत्रही लिहिले आहे.

केंद्र सरकारकडून प्रकरणाचा तपास
प्रकरणात केंद्रीय श्रम मंत्रालयाने म्हटले की, आम्ही तक्रार दाखल करुन घेतली आहे. एना सेबेस्टियन पेरायिलच्या मृत्यूच्या कारणाचा तपास केला जाईल. श्रम राज्य मंत्री शोभा करंदलाजे यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये शोभा यांनी म्हटले की, एना सेबेस्टियन पेरायिलच्या मृत्यूमुळे मी अत्यंत दु:खी आहे. याशिवाय प्रकरणासंदर्भात अधिक तपास सुरु केला आहे. श्रम मंत्रालयाने अधिकृतपणे तक्रार आम्ही हाथी घेतली आहे.

तरुणीच्या आईचे पत्र
तरुणीची आई अनिता ऑग्सटीनने EY कंपनीचे चेअरमन राजीव मेमानी यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये अनिता यांनी दावा केला आहे की, 26 वर्षीय मुलीकडून ऑफिसचे एवढे काम करुन घेण्यात येत होते की, ज्यामुळे तिची प्रकृती बिघडली गेली. कंपनीत नोकरीसाठी रुजू झाल्याच्या अवघ्या चार महिन्यांमध्येच मुलीचा मृत्यू झाला. एवढेच नव्हे मुलीच्या अंत्यंसंस्कारावेळी कंपनीतील एकही व्यक्ती आला नाही. पत्रात मुलीच्या आईने असेही म्हटले की, माझ्या प्रिय मुलीला मी गमावले आहे. अत्यंत दु:खी होऊन पत्र लिहित आहे. माझी अशी अपेक्षा आहे की, माझ्यासारखे दु:ख कोणत्याच दुसऱ्या परिवाराला सहन करावे लागू नये.

तरुणीच्या आईने पुढे म्हटले की, माझी मुलगी फार हुशार होती. शाळेत आणि महाविद्यालयातही उत्तम गुणांनी उत्तीर्ण व्हायची. एवढेच नव्हे सीएसारखी कठीण परीक्षा देखील पास झाली होती. EY सारख्या कंपनीत पहिलीच नोकरी मिळाल्याने मुलगी अत्यंत खुश होती. पण नोकरीच्या चार महिन्यांमध्येच तिचा मृत्यू झाला.

कंपनी काय म्हणाली?
EY कंपनीने एनाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. कथित रुपात अत्याधिक कामाच्या बोझ्यामुळे एनाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. ही बातमी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून कामाच्या ठिकाणी वाढणारा दबाबाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

कंपनीने एनाच्या मृत्यूबद्दल म्हटले की, "जुलै 2024 मध्ये एना सेबेस्टियनच्या निधनाबद्दल आम्ही दु:खी आहोत. कंपनी तिच्या परिवाराच्या संपर्कात असून त्यांची मदत करत आहे." जुलै महिन्यात एनाचा मृत्यू झाल्यानंतर आता परिवाराने कंपनीला एक पत्र लिहून कामाच्या अत्याधिक बोझ्यामुळे सर्वकाही झाल्याची तक्रार त्यामध्ये केली आहे.

आणखी वाचा : 

नागपूरमध्ये 9 वर्षांच्या मुलीवर छोट्या बहिणी देखत बलात्कार, संशयिताचा शोध सुरू

राशन दुकानात 1 नोव्हेंबरपासून ‘या’ नागरिकांना मिळणार नाही राशन, कारण जाणून घ्या!

Share this article