बुधवार, १८ सप्टेंबर २०२४ च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर...

एशियानेट न्यूज पोर्टलवर १८ सप्टेंबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…

१. लालबाग गणपतीची मिरवणूक गिरगाव परिसरात दाखल झाली आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. 

२. गणपती आमचा स्ट्राईक रेट वरच ठेवतील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना गणपती सद्बुद्धी देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

३. कोल्हापूर आणि नागपूर येथे बंदी झुगारून लेझर शोचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. 

४ . २० तासानंतरही पुण्यात मिरवणुका सुरु आहेत. पुण्यात मिरवणुका सुरु असून येथे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली आहे. 

५. भाजपचे नेते आणि माजी आमदार बापूसाहेब पाठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. त्यांना वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

६. जम्मू काश्मीर येथे आज विधानसभा निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्यातील निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. 

७. एक राष्ट्र, एक निवडणूक, केंद्रीय मंत्रिमंडळाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे

Share this article