Pandharpur–Tirupati Railway : पंढरपूर ते तिरुपती, थेट दर्शनासाठी विशेष रेल्वे! संपूर्ण वेळापत्रक लगेच पाहा!

Published : Dec 14, 2025, 07:18 PM IST

Pandharpur–Tirupati Railway : मध्य रेल्वेने पंढरपूर, तिरुपती या 2 प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणारी साप्ताहिक विशेष रेल्वेसेवा सुरू केली. सोलापूर विभागाद्वारे चालवली जाणारी ही सेवा डिसेंबर २०२५ मध्ये धावणार असून, यामुळे भाविकांचा प्रवास सुकर होणार आहे.

PREV
16
पंढरी ते तिरुपती एकाच प्रवासात!

Pandharpur–Tirupati Railway : पंढरपूर आणि तिरुपती या दोन प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणारी आनंदाची बातमी भाविकांसाठी आली आहे. पंढरीच्या विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर थेट तिरुपतीच्या बालाजींच्या दर्शनासाठी जाणं आता अधिक सोपं होणार आहे. भाविकांच्या वाढत्या मागणीचा विचार करत मध्य रेल्वेने पंढरपूर–तिरुपती दरम्यान थेट साप्ताहिक विशेष रेल्वेसेवा सुरू केली आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ही विशेष सेवा सुरू करण्यात आली असून सोलापूर, पंढरपूर आणि तिरुपतीकडे जाणाऱ्या हजारो भाविकांना याचा मोठा फायदा होणार आहे. 

26
तिरुपती – पंढरपूर साप्ताहिक विशेष रेल्वे

तिरुपतीहून पंढरपूरकडे जाणारी विशेष गाडी क्रमांक 07012 ही 20 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत दर शनिवारी चालणार आहे. ही गाडी सायंकाळी 04:40 वाजता तिरुपतीहून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी 06:50 वाजता पंढरपूरला पोहोचेल.

36
या स्थानकांवर असणार थांबा

या गाडीला रेणिगुंटा, राजमपेटा, ओंटिमिट्टा, कडपा, येरगुंटला, ताडिपत्री, गूटी, डोन, कर्नूल सिटी, गदवाल, वनपर्ती रोड, महबूबनगर, जडचर्ला, शादनगर, उमदानगर, काचीगुडा, सिकंदराबाद, बेगमपेट, लिंगमपल्ली, शंकरपल्ली, विकाराबाद, जहीराबाद, बीदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, लातूर, धाराशिव, बार्शी टाऊन, कुर्डूवाडी आणि मोडनिंब या स्थानकांवर थांबा असणार आहे.

46
पंढरपूर – तिरुपती विशेष रेल्वे

पंढरपूरहून तिरुपतीकडे जाणारी विशेष गाडी क्रमांक 07032 ही 21 डिसेंबर 2025 ते 28 डिसेंबर 2025 दरम्यान दर रविवारी धावणार आहे. ही गाडी रात्री 08:00 वाजता पंढरपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 10:30 वाजता तिरुपतीला पोहोचेल. 

56
या स्थानकांवर असणार थांबा

या रेल्वेला मोडनिंब, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, उदगीर, भालकी, बीदर, जहीराबाद, विकाराबाद, शंकरपल्ली, लिंगमपल्ली, बेगमपेट, सिकंदराबाद, चर्लपल्ली, नलगोंडा, मिर्यालगुडा, नडीकुडी, सत्तेनपल्ली, गुंटूर, तेनाली, बापटल्ला, ओंगोल, नेल्लूर, गुडूर, श्रीकालहस्ती आणि रेणिगुंटा येथे थांबा देण्यात आला आहे. 

66
प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीचे वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा

दरम्यान, प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाडीचे वेळापत्रक तपासून वैध तिकिटासहच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Photos on

Recommended Stories