Operation Tiger : 'ऑपरेशन टायगर' वर चंद्रशेखर बावनकुळे ते संजय निरुपम; राजकीय नेत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया (Watch Video)

Published : Jun 17, 2026, 11:01 AM IST
Operation Tiger

सार

Operation Tiger : महाराष्ट्राच्या राजकरणात मोठ्या घडामोडी सुरू झाल्या आहेत. अशातच ऑपरेशन टायगरचे नाव सर्वत्र घेतले जात असून यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याच स्थितीवर राज्यातील राजकीय नेतेमंडळींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Operation Tiger : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून काहीतरी उलथापालथ सुरू असल्याचे चित्र दिसून आले. एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या गटातील काही खासदार शिंदेंना जाऊन मिळण्याच्या चर्चेने जोर धरला आहे. तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरने खळबळ उडवली आहे. या ऑपरेशन टायगरमुळे उद्धव ठाकरेंच्या गटात पुन्हा एकदा वर्ष 2022 मध्ये झालेल्या बंडासारखी स्थिती निर्माण होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याच स्थितीवर राज्यातील विविध राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की,उद्धव ठाकरे यांचे खासदार कुठे गेलेत याच्याशी भाजपाचा काहीही संबंध नाही. उद्धव ठाकरेंना माहिती असले पाहिजे त्यांचे खासदार आणि आमदार का सोडून जात आहेत. जर ते एकनाथ शिंदेंकडे जात असतील तर याचा त्यांच्याशी संबंध आहे. पण आमचे मुख्यमंत्री किंवा भाजपाच्या कोणत्याही नेत्याशी याचा काहीही संबंध नाही. या प्रकरणात भाजपाला का ओढले जातेय असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. याशिवाय संजय राऊतांनी लावलेल्या आरोपांवरही बावनकुळे यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

 

 

नाना पटोले काय म्हणाले? 

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी म्हटले की, हे ऑपरेशन टायगर नाहीये. हे 'ऑपरेशन जॅकल' आहे. याशिवाय पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह सरकारवर टीका केली. यापुढे संजय राऊत यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देत म्हटले की, ...ते आणखी पैसे देऊ शकतात. कारण त्यांनी देशाला लुटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांच्या युतीकडून लोकशाही व्यवस्थेची हत्या करण्याच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो असेही पटोले यांनी म्हटले.

 

 

शायना एन्सी यांची शिंदेंबद्दल प्रतिक्रिया

शिंदे यांच्या शिवसेना गटातील नेत्या शायना एन्सी यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे जनसामान्यांचे नेते आहेत. वेगवेगळ्या राजकीय पक्षातील नेते त्यांच्या कार्यापासून प्रभावित होत त्यांना भेटतात. एकनाथ शिंदे यांचे एकच ध्येय आहे -'ऑपरेशन प्रगती' म्हणजे राज्याचा विकास. यामुळे कोणत्याही प्रकारचे अंदाज लावू नयेत.

 

 

आशिषराव देशमुख काय म्हणाले?

 

संजय निरुपम यांची प्रतिक्रिया

 

 

PREV
Read more Articles on

Recommended Stories

UBT MPs Rebellion : ठाकरे गटात पुन्हा मोठा राजकीय भूकंप? उद्धव ठाकरेंच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेकडे राज्याचे लक्ष
तुकाराम मुंढे यांचं एक बाटली रक्त काढा, माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र