पाऊस कधी येणार? अखेर डख यांनी सांगितली तारीख, लवकरच पेरणीला होणार सुरुवात

Published : Jun 16, 2026, 10:30 PM IST
Karnataka Rain Red Alert

सार

राज्यात पावसाळा लांबल्याने शेतकरी चिंतेत आहेत, पण हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलासा दिला आहे. त्यांनी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस सुरू होईल असा अंदाज वर्तवला आहे. डख यांच्या मते, शेतकरी १० ते १५ जुलै दरम्यान पेरणी करू शकतील.

राज्यात आता पावसाळ्याचा हंगाम सुरु झाला आहे. पण अजूनही पावसाला सुरुवात झालेली नाही. पाऊस येत नाही म्हणून शेतकरी चिंतेत पडलेला आहे. एकदा कधी पाऊस होतोय आणि पेरणीला सुरुवात करतोय असं शेतकरी राजाला झालेलं आहे. अल निनो वादळामुळं पाऊस होत नाही असं त्यानं सांगितलेलं आहे.

पंजाबराव डख काय म्हणाले? 

पंजाबराव डख यांनी पाऊस कधी होणार याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, यंदा भरपूर पाऊस पडणार असल्याचं सांगितलं आहे. राज्यात आणि देशात पाऊस न पडल्यामुळं नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झालं आहे. या संकटामुळे राज्यावर दुष्काळाचे संकट कोसळले आहे. त्यामुळं पाणीकपात करण्यात आली आहे.

पाऊस कधी येणार, डख काय म्हणाले? 

पंजाबराव डख यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे की, यंदा भरपूर पाऊस पडणार आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस होणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या पेरण्या लवकरच सुरु होतील. पेरण्या १० जुलै ते १५ जुलैच्या दरम्यान आपण पेरणी करू शकणार आहेत.

महाराष्ट्रात मान्सून कधी येणार? 

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. तो दाखल झाल्यानंतर आता स्थिरावला आहे. पण वारा सुटण्याची परिस्थिती निर्माण झाल्यामुळं शेतकऱ्यांना पाऊस होणार नाही असं वाटत आहे. पण पाऊस आता लवकरच दाखल होणार असल्याचं डख यांनी म्हटलं आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

दिल्लीत रात्रीत मोठी घडामोड! ठाकरे गटाचे 'ते' 6 खासदार कोण? ज्यांच्यामुळे ठाकरेंची चिंता वाढली!
राज्यात मुसळधार पाऊस बरसणार, हवामान विभागाने वर्तवला अंदाज