नागपुरातील 9 फेमस Food, तर्री पोहा, आलुबोंडा आणि बरंच काही, जाळ अन् धूर संगटच!

Published : May 12, 2025, 02:23 PM ISTUpdated : May 17, 2025, 04:10 PM IST

नागपूर हा खवय्यांचा स्वर्ग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी असो, प्रसिद्ध गझलकार सुरेश भट असो खाण्याच्या सुरस कथा मोठ्या चविने चर्चिल्या जातात. आज आपण नागपुरातील खास ९ पदार्थांची माहिती जाणून घेणार आहोत.

PREV
19

तर्री पोहा

तर्री पोहा नागपुरची ओळख आहे. यातील पोहे अगदी कांदा पोह्यांप्रमाणे बनवले जातात. आणि त्यावर चिखट असा चण्याचा रस्सा टाकला जातो. तसेच या रस्स्यात उकडलेले अर्धे टोमॅटोही त्यावर ठेवले जाते.

29

आलुबोंडा

आलुबोंडा हा आलुवड्याचाच प्रकार असला तरी त्याची चव मात्र न्यारीच आहे. यातील आलुच्या भाजीला जरा तिखट चव असते. तर त्यावरील बेसनाचे आवरण आलुवड्याच्या तुलनेत जरा जाड असते.

39

कढी पातोडी

पातोडीला उर्वरीत महाराष्ट्रात सांभरवडी म्हटले जाते. पण नागपुरात मिळणार्या पातोडीचे स्टफिंग जरा वेगळे असते. या पातोडीला तोडून त्यावर उकळती कढी टाकली जाते.

49

पालक वडा

पालक वडा हा डाळ वड्याचाच एक प्रकार आहे. हैदराबादला गेल्यावर डाळ वडा खायला मिळतो. तो तेथील प्रसिद्ध पदार्थ आहे. पण डाळ वडा जरा आकाराने मोठा असतो. चविबद्दल तर बोलायलाच नको.

59

नागपुरी पाणीपुरी

नागपुरमध्ये पाणीपुरी खाण्याची मजा काही औरच आहे. कोरड्या पाणीपुरीत उकडलेला बटाटा आणि मटार टाकले जातात. त्यानंतर ती पाणीपुरी गोड आणि तिखट पाण्याने आटोकाट भरली जाते. तिची चव म्हणजे स्वर्गच.

69

संत्रा बर्फी

नागपुरी संत्रा अवघ्या भारतात प्रसिद्ध आहे. त्याच संत्र्यापासून संत्रा बर्फी बनवली जाते. तिची चव म्हणजे ती जिभेवर ठेवल्यावरच कळते. अगदी ब्रम्हानंदी टाळी वाजल्याची अनुभूती येते.

79

मटार उसळ

मटार रात्रभर भिजत घालून त्याची तिखट अशी भाजी केली जाते. स्थानिक मसाल्यांच्या मदतीने तिला चविला आणखी रंगत येते. ही मटार उसळ चपातीसोबत किंवा पावासोबत खाल्ली जाते. गोव्यातही अशी मटार उसळ प्रसिद्ध आहे.

89

सावजी नॉनव्हेज

सावजी नॉनव्हेज हीही नागपुरची ओळख आहे. त्यात चिकन आणि मटण या दोन्हीचा समावेश होतो. तिखट हा प्रमुख गुणधर्म असला तरी त्याची चव न्यारी असते. स्थानिक मसाले चविला आणखी वरच्या स्तरावर नेतात.

99

मुंग भजे

मुंग भजे हा खाद्यपदार्थ आता बर्याच शहरांमध्ये मिळतो. पण नागपुरचे मुंग भजे जरा कडक असतात. त्यामुळे ते खायला क्रिस्पी लागतात. तसेच त्यासोबतची पुदिन्याची आणि गोड इमली चटणी वेगळी अनुभूती देते.

Read more Photos on

Recommended Stories